Police Bharti 2022 : पोलीस बनणं स्वप्न नसून ध्येय आहे…अशी करा गणित विषयाची तयारी

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा करण्यात (Police Bharti 2022) आली आहे. राज्य सरकारनं तब्बल 18,000 पेक्षा अधिक पोलीस कॉन्स्टेबल भरतीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता रानातील तरुणांना पोलीस होण्याचा गोल्डन चान्स मिळणार आहे. त्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. तसंच 9 नोव्हेंबर 2022 पासून यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र ही भरती प्रक्रिया होणार तरी कशी? तसंच या अंतर्गत होणाऱ्या लेखी परीक्षेचा सिलॅबस नक्की कसा असणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आम्ही तुम्हा देणार आहोत.

परीक्षेचं स्वरुप (Police Bharti 2022)

पोलिस भरती परीक्षा प्रक्रियेत दोन चाचण्या घेण्यात येणार आहेत. यामध्ये शारीरिक चाचणी आणि लेखी चाचणी होणार आहे. सुरुवातीला उमेदवारांची शारीरिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेचं आयोजन करण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षांच्या पॅटर्नबद्दल जाणून घेऊया.

लेखी परीक्षा

100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे. लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटांचा असेल व ही परीक्षा मराठी (Police Bharti 2022) भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. परीक्षा मराठीतूनच होणार आहे. परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे. त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल. पोलीस भरती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.

गणित विषयाचा सिलॅबस

संख्या व संख्याचे प्रकार  – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार

वर्ग व वर्गमूळ – घन व घनमूळ

शेकडेवारी – कसोट्या

म.सा.वी आणि ल.सा.वी. – पूर्णाक व त्याचे प्रकार

अपूर्णांक व त्याचे प्रकार – भागीदारी

गुणोत्तर व प्रमाण – सरासरी (Police Bharti 2022)

दशमान पद्धती – नफा-तोटा

काळ, काम, वेग – सरळव्याज व चक्रवाढ व्याज

घड्याळावर आधारित प्रश्न – घातांक व त्याचे नियम

गणित विषयांमध्ये एकूण 25 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यापैकी प्रत्येक प्रश्नाला एक मार्कांचं वेटेज असणार आहे. तसंच एकूण मार्कांमध्ये स्कोर करण्यासाठी गणित येणं खूप आवश्यक (Police Bharti 2022) असणार आहे. त्यामुळे तुम्हालाही हे गणिताचं भूत उतरवायचं असेल तर सिलॅबसनुसार अभ्यास करणं आवश्यक आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com