Police Bharti 2022 : पोलीस भरतीच्या वयोमर्यादेत मोठे बदल ‘या’ उमेदवारांना होणार मोठा फायदा

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात शिंदे- फडणवीस सरकारडून काही (Police Bharti 2022) दिवसांआधी पोलीस भरती जाहीर करण्यात आली होती. मात्र त्यांनतर लगेचच काही तांत्रिक मुद्दा समोर आल्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. मात्र नक्की कशामुळे ही भरती थांबवण्यात आली आहे याबद्दल काही स्पष्टता नव्हती. आता हा तांत्रिक मुद्दा दूर झाला आहे आणि राज्यात पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या उमेदवारांना होणार फायदा (Police Bharti 2022)

कोरोना काळात ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे अशा उमेदवारांना या भरतीत जागा मिळेल का यावर प्रश्नचिन्ह होतं. अशा उमेदवारांनी सरकारकडे दादही मागितली होती. त्यामुळेच आता सरकारनं आणि गृहविभागाने मोठा निर्णय घेत अशा उमेदवारांना पोलीस भरतीची संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

असे उमेदवार ज्यांनी कोरोना काळात फॉर्म भरले (Police Bharti 2022) आहेत त्यांची वयोमर्यादा समाप्त झाली होती. त्यामुळे ते परीक्षेला बसण्यासाठी पात्र नव्हते. आता अशा उमेदवारांच्या वयोमर्यादेत शिथिलता आणण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. त्यामुळे या सर्वच उमेदवारांना आता पोलीस भरतीसाठी संधी मिळणार आहे. तसंच यामुळे पोलीस भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.

विभागानुसार पदे –

मुंबई – 6740, ठाणे शहर – 521, पुणे शहर – 720, पिंपरी चिंचवड – 216, मिरा भाईंदर – 986, नागपूर शहर – 308, नवी मुंबई – 204, अमरावती शहर – 20, सोलापूर शहर- 98, लोहमार्ग मुंबई – 620, ठाणे ग्रामीण – 68, रायगड -272, पालघर – 211, सिंधूदुर्ग – 99, रत्नागिरी – 131, नाशिक ग्रामीण – 454, अहमदनगर – 129, धुळे – 42, कोल्हापूर – 24, पुणे ग्रामीण – 579, सातारा – 145, सोलापूर ग्रामीण – 26, औरंगाबाद ग्रामीण- 39, नांदेड – 155, परभणी – 75, हिंगोली – 21, नागपूर ग्रामीण – 132, भंडारा – 61, चंद्रपूर – 194, वर्धा – 90, गडचिरोली – 348, गोंदिया – 172, अमरावती ग्रामीण – 156, अकोला – 327, बुलढाणा – 51, यवतमाळ – 244, लोहमार्ग पुणे – 124, लोहमार्ग औरंगाबाद -154, एकूण – 14956 (Police Bharti 2022)

कोणत्या प्रवर्गाला किती जागा?

अनुसूचित जाती – 1811, अनुसूचित जमाती – 1350, विमुक्त जाती (अ) – 426, भटक्या जमाती (ब) – 374, भटक्या जमाती (क) -473, भटक्या जमाती (ड) – 292, विमुक्त मागास प्रवर्ग – 292, इतर मागास वर्ग – 2926 इडब्लूएस – 1544, खुला – 5468 जागा, एकूण – 1495

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com