Police Bharati : तृतीय पंथीयांचं सरकारला साकडं; ‘पोलीस दलात भरती करा अन्यथा कोर्टात जावू…’

करिअरनामा ऑनलाईन। राज्यात महाराष्ट्र पोलीस भरतीची घोषणा (Police Bharati) करण्यात आली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल अठरा हजार जागांसाठी ही पोलीस भरतो होणार आहे. राज्यातील तरुण तरुणींना यामध्ये अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. या भरतीसाठी अधिसूचना आणि अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र आता या पदभरतीमध्ये कोणताही लिंगभेद न मानता तृतीय पंथीयांनाही संधी देण्यात यावी; अशी मागणी करण्यात आली आहे.

तृतीयपंथीयांना नेहमीच कोणत्याही नोकरी किंवा आरक्षणात डावललं  जात अशी तक्रार नेहमीच असते. कोणत्याही नोकरीमध्ये सामावून घेण्यास त्यांच्यामध्ये मतभेद (Police Bharati) केला जातो. मात्र सरकारी नोकरीमध्ये आपल्याला संधी देण्यात यावी; अशी त्यांची अपेक्षा असते. म्हणूनच राज्याच्या पोलीस भरतीमध्ये कुठलाही लिंगभेद न मानता सहभागी होण्याची संधी मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ही मागणी मान्य करण्यात आली नाही तर न्यायलयात धाव घेवू; असा इशारा तृतीयपंथीयांनी दिला आहे.

मुखमंत्र्यांकडे घेतली धाव (Police Bharati)

न्यायालयानं दिलेल्या एका आदेशानुसार तृतीय पंथियांना देखील भरती प्रक्रियेत संधी देणं गरजेचं असल्याच विधी तज्ञांनी  म्हटलं आहे. मात्र पोलीस भरतीमध्ये सहभागी होण्यासाठीचा अर्ज भरण्याची मुदत केवळ 30 नोव्हेंबर पर्यंतच असल्याने यां तृतीयपंथियांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि पोलीस भरतीमध्ये संधी देण्यासाठी विनंती केली आहे.

पोलीस अधिकारी सकारात्मक

राज्यातील माजी पोलीस महासंचालक मीरा बोरवणकर आणि अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी तृतीय पंथीयांना पोलीस दलात स्थान मिळावं म्हणून सकारात्मकता दर्शवली आहे. छत्तीसगडमध्ये (Police Bharati) पोलीस दलात तृतीय पंथीयांची भरती केली आहे. या पार्श्वभूमीवर पुरोगामी महाराष्ट्रात केवळ लिंगभेद करून तृतीय पंथीयांना त्यांच्या हक्कापासून वंचीत ठेवले जावू नये; असं या अधिकाऱ्यांचं मत आहे.  तृतीयपंथीयांनी केलेल्या मागणी बाबत राज्य सरकार काय निर्णय घेतं याकडे सर्वांचे लक्ष आहे.

तृतीय पंथीयांकडून अभ्यास आणि सरावास सुरुवात

इतकंच नाहीतर अनेक तृतीय पंथीयांनी पोलिस भरतीसाठी सरावही सुरु केला आहे. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत सुरक्षा रक्षक पदी नेमणूक झालेली राज्यातील पहिली तृतीय (Police Bharati) पंथीय आहे. निकिता प्रमाणेच तिचे इतर चार साथीदार देखील सुरक्षा रक्षकपदी आपलं कर्तव्य बजावत आहेत. मात्र आता या सगळ्यांची जिज्ञासा वाढली आहे. बरेच होतकरू तृतीय पंथीय पोलीस बनण्याचं स्वप्न बघत आहेत. या भरतीसाठी अनेकांनी मैदानी सराव आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास  सुरु केला आहे. म्हणूनच आता या पदभरतीमध्ये कुठलाही लिंगभेद न मानता सहभागी होण्याची संधी मिळावी; अशी मागणी जोर धरत आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com