Police Bharati 2022 : तयारीला लागा!! पोलिस भरतीची तारीख जाहीर

करिअरनामा ऑनलाईन | पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी (Police Bharati 2022) गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज एक खुशखबर दिली आहे. पोलिस भरती प्रक्रिया कधी पासून सुरू होणार याची उत्सुकता आता संपली संपली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस भरती संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.

राज्याच्या गृहविभागाकडुन 7 हजार पोलिस शिपाई पदांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. सध्या राज्यात 50 हजार पोलिसांची रिक्त पदे आहेत. त्यातील साडेपाच हजार पोलिस शिपायांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आता नव्याने सात हजार पदांची पोलीस भरती लवकरच सुरू होणार आहे. 15 जून पासून ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

7 हजार पोलिस शिपाई भरती प्रक्रिया (Police Bharati 2022) झाल्यानंतर पुढच्या टप्प्यांमध्ये पंधरा हजार पोलीस शिपाई भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, तसा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवला जाणार आहे. या भरतीला राज्य मंत्रिमंडळाकडून परवानगी मिळेल असा विश्वास गृहमंत्री वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांवर सध्या खूप मोठा ताण आहे, तो कमी करण्यासाठीच पोलिसांचे संख्याबळ वाढवण्याचे राज्यसरकारचे धोरण आहे. नव्याने होणाऱ्या पोलिस भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी वळसे-पाटील म्हणाले.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com