पिंपरी – चिंचवडला आजपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु

करिअरनामा ऑनलाईन ।शहरातील महापालिकेच्या व खासगी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग  आजपासून  सुरू करण्यात येणार आहे, असा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी  काढला आहे . कोविड टेस्ट निगेटिव्ह आलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच नियुक्त करावे, विद्यार्थ्यांचे पालकांचे संमतिपत्र घ्यावे व शाळा, वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करावे, अशा सूचना सर्व शाळा व्यवस्थापनाला केल्या आहेत.

राज्य सरकारच्या आदेशानुसार, नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार होते. मात्र, कोरोना रुग्णसंख्या अधिक असल्याच्या कारणास्तव आयुक्त हर्डीकर यांनी तीन जानेवारीपर्यंत शहरातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्या आदेशाची मुदत संपत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आयुक्तांनी नवीन आदेश काढला आहे.

हर्डीकर यांनी नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार, कोरोना चाचणी निगेटिव्ह आलेल्या व कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच कामावर हजर करून घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी शाळेतील शंभर टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची “कोविड टेस्ट’ बंधनकारक केली आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com