पालकांनो तुम्हीच सांगा , शाळा कधी सुरु करायच्या?

दिल्ली । देशभरात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच अनेक राज्यांमध्ये लॉक डाउन ची घोषणा पुन्हा एकदा केली आहे. काही राज्यांमध्ये शाळा या ऑनलाईन मोड वर सुरु केलेल्या आहेत. तर काही राज्यांनी अद्याप शाळा सुरु केलेल्या नाहीत. त्यातच शाळा केव्हा सुरु होणार असा प्रश्न अनेक पालकांना पडला आहे. त्याच अनुषंगाने मानवी विकास संसाधन मंत्रालयाचा भाग असलेला शालेय आणि साक्षरता विभागाने सर्व केंद्रशासित प्रदेश्याना पत्र पाठवून शाळा कधी सुरु करायच्या?, ऑगस्ट सप्टेंबर कि ऑक्टोबर याबाबतीत पालकांचे फीडबॅक मागितले आहेत. अशी माहिती राज्य सचिवांनी दिली आहे. २९ जून रोजी गृहमंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या अनलॉक-२ च्या गाइडलाइन्स नुसार शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था ३१ जुलैपर्यंत बंद राहणार आहेत.

अनेक राज्यातील अधिकारांची या वृत्ताला दुजोरा दिला आहे पण मानवी विकास संसाधन मंत्रालयाने याबाबत कोणतीही माहिती अधिकृत संकेतस्थळावरून जाहीर केली नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १७ जुलैपासून नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे, आणि आज २० जुलै अभिप्राय नोंदवण्याचा शेवटचा दिवस आहे. अनेक राज्यांतील शिक्षण सचिवांना याबात पालकांची मते घेण्यासाठी विनंती करण्यात आली आहे.

मंत्रालयाकडून दोन प्रश्न विचारले गेले आहेत, एक म्हणजे पालकांच्या मतानुसार शाळा कधीपासून सुरु केल्या जाव्यात आणि दुसरा शाळा सुरु केल्यानंतर पालकांच्या काय काय अपेक्षा असणार आहेत? याबाबत विचारणा करण्यात आली आहे. एककीकडे राज्य सचिवांनी हे वृत्त खरे असल्याचे म्हंटल आहे तर अनेक शाळांनी आम्हाला अश्या प्रकारचा कोणताही मेल आला नसल्याची माहिती दिली आहे.

हे पण वाचा -
1 of 25

दिल्लीतील केंद्रीय विद्यालयातील मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, “पालकांकडून अभिप्राय घेऊन नोंदवण्यासंबंधी असा कोणत्याही प्रकारचा मेल किंवा माहिती आमच्यापर्यंत पोहचलेली नाही कि मिळालेली पण नाही. मात्र दोन आठवड्यांपूर्वी केंद्रीय महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकांची आणि पालक यांची बैठक झाली अद्यापही शाळा सुरु करण्याविरोधात पालकांचे मत असल्याचे त्यांनी सांगितले. ”.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com