पालकांना मिळणार दिलासा ! शालेय फी संदर्भात राज्य शासनाचा मोठा निर्णय

करिअरनामा ऑनलाईन । शालेय फी संदर्भात राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. शालेय फी कशा प्रकारे कमी करता येईल याबाबत कायदेशीर बाबी तपासून शासनास अहवाल सादर करण्यासाठी शिक्षण तज्ञ अधिकार्यांची शासन स्तरावर एक समिती स्थापन करण्यासाठीकरण्याचा निर्णय घेतला आहे. यावर अतिंम निर्णय काय असणार हे बघणे अधिक महत्वाचे असणार आहे.

लॉकडाऊनच्या काळातही काही संस्था तसंच शाळा पालकांना शैक्षणिक फी भरण्याची सक्ती करत होत्या. त्यामुळे,याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानं शासनानं परिपत्रक काढत सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी विद्यार्थ्यांना या आणि आगामी वर्षाची शैक्षणिक फी भरण्यास सक्ती करू नये, असे आदेश दिले होते. मात्र, शासनाच्या या निर्णयाविरोधात काही खासगी संस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर आतापर्यंत २३ वेळा सुनावणी झाली आहे.

दरम्यान, सर्व बोर्डाच्या, सर्व माध्यमांच्या आणि पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या दृष्टीने शिल्लक फी एकदाच न घेता ती टप्प्यानं किंवा त्रैमासिक पद्धतीनं घ्यावी. यंदाच्या शैक्षणिक वर्षात कोणतीही फी वाढ करु नये. तसंच फी ऑनलाईन भरण्याचा पर्याय द्यावा, असे आदेश शासनाने दिला होता.याविरोधात संस्थांनी याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयानं शपथपत्र दाखल करण्याची संधी न देताच शासनाच्या या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली. यानंतर शासनानं याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. यावर निकाल देत कोर्टाने एका आठवड्यात राज्य शासनाला शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. यानंतर शासनानं हे शपथपत्र दाखलही केलं आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com