शाळा सुरु व्हाव्यात पण पालकांच्या संमतीबाबत शिक्षक साशंक

करिअरनामा  ऑनलाईन ।दिवाळी नंतर शाळा सुरु करण्यासाठी शिक्षकांचे मत अनुकूल असले तरी पालक मुलांना शाळेत जाऊ देणार का , याबाबत शिक्षक सांशक आहेत.राज्यातील ५५० हुन अधिक शिक्षकांच्या मतांची पडताळणी केली असता,शाळा सुरु करण्याचा निर्णय योग्य असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

शाळा बंद, ऑनलाईन अभ्यास अशा स्वरूपात सुरु असलेल्या वर्गांनी शिक्षकांनाही बेजार केले आहे.दिवाळीनंतर शाळा सुरु करण्याचा शासनाचा निर्णय योग्य असल्याचे मत शिक्षकांनी गुगल अर्जाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात व्यक्त केले आहे.कोरोना काळातील अडचणी,शाळा सुरु कराव्यात का, ऑनलाईन शिक्षण,दहावी – बारावीची परीक्षा अशा मुद्यावर शिक्षकांचे मत जाणून घेण्यात आले.माध्यमिक शिक्षक जयवंत कुलकर्णी यांनी हे सर्वेक्षण केले.

राज्यातील ५५० हुन अधिक शिक्षकांनी अर्जाच्याद्वारे आपले मत नोंदवले.त्यापैकी ६१ टक्के शिक्षकांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय योग्य असल्याचे नमूद केले आहे. हा निर्णय अयोग्य असल्याचे मत १७.९ टक्के शिक्षकांनी नोंदवला तर याबाबत सांगता येत नाही असे मत २१.९ टक्के शिक्षकांनी नोंदवले.मात्र शाळा सुरु केल्या तरी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार का याबाबत संभ्रम आहे. पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत असे ३६.८ टक्के शिक्षकांना वाटते,तर ३९.२ टक्के शिक्षकांनी याबाबत सांगता येत नाही असे मत नोंदवले आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com