Home Blog Page 181

Career Success Story : सिध्दीनं आकाश कवेत घेतलं!! जिद्दीने बनली ‘फ्लाईंग ऑफिसर’ 

Career Success Story of Sidhdi Ghadge

करिअरनामा ऑनलाईन। खेळाबरोबरच सिद्धीला वक्तृत्वाची (Career Success Story) फार आवड आहे. शाळेत शिकत असताना अभ्यासातील तिची प्रगती दिवसेंदिवस उल्लेखनीय होत होती. दहावीमध्ये शिकत असताना तिने 90.40% गुण मिळवून विशेष प्राविण्य प्राप्त केले होते. शालेय जीवनात गगनभरारी घेण्याचे अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. असं स्वप्न पाहणारी एक चिमुरडी म्हणजे सिध्दी… जीने उघड्या डोळ्याने स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षातही उतरवले…

लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं
सिध्दी विकास घाडगे ही बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडियम स्कूलची विद्यार्थीनी आहे. तिने भारतीय वायुदलात ‘फ्लाईंग ऑफिसर’ पदाला गवसणी घातली आणि लहानपणीचं स्वप्न पूर्ण केलं. तिच्या यशात शाळेच्या प्राचार्या जॉयसी जोसेफ आणि शिक्षकांचा मोलाचा सहभाग असल्याचे तिच्या पालकांनी सांगितले.
एअर फोर्सच्या परिक्षेत केली उत्कृष्ठ कामगिरी 
सिध्दी घाडगे हिने AFCAT (Air Force Common Entrance Test) व AFSB (Air Force Selection Board) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या लेखी परीक्षा व मुलाखतीत चमकदार कामगिरी केली. संपूर्ण भारतातून तिने गुणवत्ता यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. बालपणापासूनच तिने आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने सर्वांना प्रभावित केले होते. एवढंच नव्हे; तर  प्राथमिक व माध्यमिक विभागात उत्कृष्ट विद्यार्थिनी, सलग तीन वर्षे उत्कृष्ट मैदानी खेळाडू म्हणून शाळेने तीला सन्मानित केले आहे.

खेळातही मागे हटली नाही (Career Success Story)
बांबू उडी क्रीडा प्रकारात तिने राष्ट्रीय पातळीवर आणि पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत राज्य पातळीवर तिने चमकदार कामगिरी केली आहे. क्रीडा क्षेत्रात तिने मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेदरम्यान तिचा गौरव करण्यात आला होता.

होतोय कौतुकाचा वर्षाव
खेळाबरोबरच सिद्धीला वक्तृत्वाचीही फार आवड आहे. अभ्यासातील (Career Success Story) तिची प्रगती उल्लेखनीय होती. इयत्ता दहावीमध्ये तिने ९०.४०% गुण मिळवून विशेष प्राविण्य श्रेणी मिळविली होती. सिध्दीच्या यशात शाळेच्या प्राचार्या जॉयसी जोसेफ व शाळेतील शिक्षकांचा मोलाचा सहभाग असल्याचे तिचे पालक सांगतात.
सिद्धीने मिळविलेल्या या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, संस्थेचे उपाध्यक्ष अँड. ए.व्ही.प्रभुणे, सचिव अँड.नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त किरण गुजर, डॉ. राजीव शहा, मंदार सिकची व रजिस्ट्रार श्रीश कंबोज यासह पालकांनी तिचे अभिनंदन केले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Career Tips : या खास कोर्सबद्दल तुम्ही ऐकलंय का? मिळवून देतील छप्पर फाड पैसा!!

Career Tips (12)

करिअरनामा ऑनलाईन । करिअरच्या चिंतेत असणारे विद्यार्थी (Career Tips) कोणाच्यातरी सांगण्यावरून एखाद्या कोर्सला प्रवेश घेतात आणि नंतर पश्चाताप करत बसतात. त्यांना त्यांच्या करिअरची चिंता करत बसण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्याने असं काहीतरी करणे आवश्यक आहे जे चौकटीच्या बाहेर जावून करता येईल. शिवाय या कोर्समधून पगारही उत्तम मिळेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही कोर्सेसबद्दल सांगणार आहोत जे थोडे वेगळे आहेत पण पगाराच्या दृष्टीने सर्वोत्तम कोर्स आहेत. यापैकी एकही कोर्स केल्यानंतर तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला देशातच नाही तर परदेशातही मागणी असेल. त्याच वेळी, करिअरसंबंधी तुमची चिंता देखील दूर होईल.

1. विटी कल्चर आणि अॅनालॉगी कोर्स
या कोर्समध्ये वाईन बनवण्याच्या पद्धती आणि त्याचे जतन करणे शिकवले जाते. हा कोर्स जगातील अनेक विद्यापीठांद्वारे ऑफर केला जातो. अमेरिकेचे वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटीया कोर्सचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम देते. याशिवाय देशातील गार्गी कृषी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, नाशिक येथे वाईन टेक्नॉलॉजीमध्ये बी.एस्सी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. एक लक्षात घ्या की, हा कोर्स केल्यानंतर तुम्ही ‘वाईन स्पेशालिस्ट’ बनून चांगला पगार मिळवू शकता.

2. कठपुतली कलेमध्ये पदवी शिक्षण
प्रत्येकाने कधी ना कधी कठपुतली नृत्य पाहिले असेलच. यामध्ये कठपुतली कलेचाही अभ्यास केला जातो; हे अनेकांना माहित नसेल. अमेरिकेतील कनेक्टिकट विद्यापीठ 3 पदवी अभ्यासक्रम ऑफर करते. या अभ्यासक्रमांची नावे आहेत;
1. बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स म्हणजेच (BFA)
2. मास्टर ऑफ आर्ट्स म्हणजेच (MA) आणि
3. मास्टर ऑफ फाइन आर्ट्स म्हणजेच (MFA)
मुंबई विद्यापीठात कठपुतली कलेचा प्रमाणपत्र अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. तुम्ही कठपुतली कला हा तुमचा छंद बनवू शकता. आजकाल कठपुतली कलाकारांना विदेशात चांगली मागणी आहे. जर आपण पगाराबद्दल बोललो, तर तुम्हाला विश्वास बसणार नाही; हा कोर्स केल्यानंतर तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.

3. टर्फ गवत विज्ञान अभ्यासक्रम (Career Tips)
या अभ्यासक्रमात पदवी आणि प्रमाणपत्र असे दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमादरम्यान गवत वाढवण्याच्या पद्धती, त्याची निगा आणि व्यवसाय व्यवस्थापन याबाबत माहिती दिली जाते. अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स आणि पेनसिल्व्हेनियासारख्या विद्यापीठांमध्ये हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. याशिवाय देशातील काही खासगी विद्यापीठेही त्यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालवतात. या कोर्सचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही गोल्फ कोर्स सुपरिटेंडंट, ग्राउंडकीपर आणि लँडस्केप डिझायनर बनू शकता. पगाराबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला लाखात पगार मिळतो. त्याचवेळी हे कोर्स केल्यानंतर जसा तुमचा अनुभव वाढत जातो, तसतसे या क्षेत्रात तुम्हाला मिळणाऱ्या पैशामध्येही वाढ होत जाते.

4. स्पा मॅनेजमेंट कोर्स
हा अभ्यासक्रम ब्रिटनच्या डर्बी विद्यापीठाने दिला आहे. या कोर्समध्ये स्पा म्हणजे काय, डाएट आणि एक्सरसाइज सोबत स्पा व्यवसाय कसा मॅनेज करायचा हे (Career Tips) शिकवले जाते. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही स्पा मॅनेजर बनू शकता. आपल्याच देशात स्पा मॅनेजरला लाखोंचे पॅकेज मिळते. तसेच हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला परदेशातही मोठी मागणी आहे.
5. कंटेम्परेरी सर्कस एंड फिजिकल परफॉर्मेंसमध्ये डिग्री
ब्रिटनचे बाथ स्पा युनिव्हर्सिटी कंटेम्पररी सर्कस अँड फिजिकल परफॉर्मन्स नावाचा (बीए ऑनर्स) पदवी अभ्यासक्रम देते. या कोर्समध्ये तुमच्या सर्कस कौशल्यासोबत फिजिकल थिएटर, परफॉर्मन्स स्किल्ससह तुमच्या सर्जनशीलतेला चालना देतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

ICAR Recruitment 2024 : ग्रॅज्युएट/इंजिनियर्ससाठी ICAR अंतर्गत नोकरीची संधी; दरमहा 30,000 पगार

ICAR Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । आयसीएआर नॅशनल ब्युरो (ICAR Recruitment 2024) ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंगमध्ये विविध पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी  खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. मुलाखत दिनांक 02 जानेवारी 2024 यादिवशी होणार आहे.

संस्था – आयसीएआर नॅशनल ब्युरो ऑफ सॉईल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1) यंग प्रोफेशनल-I (आयटी) – 01 पद
आवश्यक पात्रता – संगणक अनुप्रयोग / माहिती तंत्रज्ञान/संगणक विज्ञान/ आर्टिफिशियल इंटेलिजन्स/ऑपरेटिंग सिस्टम/ सॉफ्टवेअर अभियांत्रिकी / संगणक ग्राफिक्स मध्ये किमान 60% गुणांसह पदवीधर
2) यंग प्रोफेशनल-I (पेन्शन विभाग) -01  पद
बी.कॉम / बीबीए / बीबीएस
पद संख्या – 2 पदे

वय मर्यादा – (ICAR Recruitment 2024)
21 वर्षे ते 45 वर्षापर्यंत
SC/ST – 05 वर्षे सूट
OBC – 03 वर्षे सूट
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 30,000/- रुपये दरमहा

नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया – मुलाखत (ICAR Recruitment 2024)
मुलाखतीची तारीख – 02 जानेवारी 2024
मुलाखतीचे ठिकाण – ICAR-National Bureau of Soil Survey and Land Use Planning, Amravati Road Nagpur-440033.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.nbsslup.icar.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Job Notification : प्राध्यापकांसाठी मोठी बातमी!! वालचंद कॉलेज येथे नोकरीची संधी; 1 लाखापर्यंत मिळेल पगार

Job Notification

करिअरनामा ऑनलाईन । वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली (Job Notification) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवरांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीकरिता दिलेल्या पत्यावर दि. 01 जानेवारी 2024 रोजी हजर रहायचे आहे.

संस्था – वालचंद कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, सांगली
भरले जाणारे पद – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक
नोकरी करण्याचे ठिकाण – सांगली
वय मर्यादा – 60 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
मुलाखतीची तारीख – 01 जानेवारी 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक The candidates applying for the posts should have educational qualifications and experience as specified by All India Council for Technical Education, New Delhi, DTE (GOM) and Shivaji University, Kolhapur.
सहयोगी प्राध्यापक The candidates applying for the posts should have educational qualifications and experience as specified by All India Council for Technical Education, New Delhi, DTE (GOM) and Shivaji University, Kolhapur.
सहायक प्राध्यापक The candidates applying for the posts should have educational qualifications and experience as specified by All India Council for Technical Education, New Delhi, DTE (GOM) and Shivaji University, Kolhapur.

 

मिळणारे वेतन –

पद वेतन (दरमहा)
प्राध्यापक 1,00,000 onwards
सहयोगी प्राध्यापक 75,000 onwards
सहायक प्राध्यापक 40,000 onwards

 

अशी होईल निवड –
1. वरील रिक्त पदाच्या निवडी मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहावे.
3. उमेदवार 01 जानेवारी 2024 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीकरिता हजर राहतील.
4. मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्रे सादर करायची आहेत.
5. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – http://walchandsangli.ac.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

CDAC Recruitment 2024 : पुण्यात नोकरी!! CDAC अंतर्गत विविध पदावर भरती सुरु

CDAC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे अंतर्गत (CDAC Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सल्लागार, सल्लागार पदांच्या एकूण 18 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जानेवारी 2024 आहे.

संस्था – प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे
पद संख्या – 18 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जानेवारी 2024
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. वरिष्ठ सल्लागार – 01 पद
आवश्यक शैक्षणिक पात्रता – CA/ ICWA
2. सल्लागार -17 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी (CDAC Recruitment 2024) सह इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, फिजिक्स / संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये अभियांत्रिकी पदवीधर / क्वांटम ऑप्टिक्स किंवा क्वांटम कम्युनिकेशनमध्ये पीएच.डी / क्वांटम फिजिक्समध्ये पीएच.डी / बी.ई./बी. टेक./ एम.ई/एम.टेक./ एमसीए / इंग्रजी/मास कम्युनिकेशनमधील प्रथम श्रेणी 60% पदव्युत्तर पदवी किंवा संबंधित विषयातील समतुल्य पदवी / पीएच.डी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / एम.ए./ विज्ञानातील कोणताही पदवीधर

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 08 जानेवारी 2024 रोजी 64 वर्षापर्यंत आहे.
परीक्षा फी – फी नाही
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचे ठिकाण – Human Resource Department Centre for Development of Advanced Computing Innovation Park, 34, B/1, Panchavati Road, Pune – 411 008.

काही महत्वाच्या लिंक्स – (CDAC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.cdac.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

BMC Recruitment 2024 : 4थी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी!! मुंबई महापालिकेत निघाली ‘या’ पदावर भरती

BMC Recruitment 2024

करिअरनामा ऑनलाईन । बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध (BMC Recruitment 2024) पदावर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून 4थी पास उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी निर्माण झाली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जानेवारी 2024 आहे.

संस्था – बृहन्मुंबई महानगरपालिका
भरले जाणारे पद – सफाई कामगार
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन (BMC Recruitment 2024)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 जानेवारी 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, एच/पश्चिम विभाग, तळमजला, दुसरी हसनाबाद लेन, खार (प.), मुंबई- 400052.
आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार 4थी पास असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 45 वर्षे असावे
परीक्षा फी – फी नाही
मिळणारे वेतन – 5000/- रुपये दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

काही महत्वाच्या लिंक्स – (BMC Recruitment 2024)
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.portal.mcgm.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

IAS Success Story : दररोज 6 ते 8 तास सेल्फ स्टडी; पहिल्याच झटक्यात क्रॅक केली UPSC; कोण आहे IAS चंद्रज्योती?

IAS Success Story of Chandrajyoti Sinh

करिअरनामा ऑनलाईन । अभ्यासासाठी तिने (IAS Success Story) दररोज 6 ते 8 तास अभ्यास केला. याशिवाय जेव्हा परीक्षा जवळ आली तेव्हा तिने दिवसातून 10 तास किंवा त्याहून अधिक वेळ अभ्यास केला. इतर विषयांच्या अभ्यासासोबतच ती रोज वर्तमानपत्रे वाचत राहिली आणि दैनंदिन चालू घडामोडींची तयारी करत राहिली, त्यामुळे तिला परीक्षा पास करणे सोपे झाले; ही गोष्ट आहे IAS चंद्रज्योती सिंह हिची.
IAS चंद्रज्योती सिंह हिने 2019 मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 28 वा क्रमांक मिळवून IAS होण्याचे स्वप्न पूर्ण केले. केवळ एक वर्षाच्या तयारीनंतर पहिल्याच प्रयत्नात तिने हे यश मिळवले आहे. चंद्रज्योती सिंह हिने यूपीएससीच्या तयारीसाठी कोणत्याही कोचिंगची मदत न घेता स्वतः रणनीतीने तयार करुन सेल्फ स्टडीच्या बळावर ही परीक्षा पास केली आहे.

अवघ्या 22 व्या वर्षी क्रॅक केली परीक्षा (IAS Success Story)
कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय आणि केवळ सेल्फ स्टडीच्या बळावर ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास होणं हे फार कमी विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडते. पण ही अवघड वाटणारी कामगिरी चंद्रज्योती हिने करुन दाखवली आहे. तिने 2019 मध्ये झालेल्या परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात UPSC मध्ये संपूर्ण देशात 28 वा क्रमांक मिळवून वेगळे स्थान प्राप्त केले. एवढच नव्हे, तर वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी तिने ही परीक्षा पास क्रॅक केली आहे.

लहानपणापासून मनात आहे देशभक्ती 
चंद्रज्योतीचे वडील दलबारा सिंग हे सेवानिवृत्त आर्मी रेडिओलॉजिस्ट आहेत आणि तिची आई मीना सिंह यांनीही सैन्यात सेवा बजावली आहे. घरात सैन्याचे वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच तिच्यामध्ये देशसेवेची आवड निर्माण झाली त्यामुळे तिने IAS होण्याचे स्वप्न पाहिले.

ग्रॅज्युएशन नंतर घेतला ब्रेक
ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर चंद्रज्योती सिंह हिने एक वर्षाचा ब्रेक घेतला आणि नंतर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस (UPSC CS) परीक्षेची तयारी सुरू केली. तिच्यामध्ये इतका आत्मविश्वास होता, की अभ्यास करण्यासाठी ती केवळ सेल्फ स्टडीवर अवलंबून राहिली. त्यासाठी तिने कोणत्याही प्रकारच्या कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही.
तुमची रणनीती तुम्हीच तयार करा (IAS Success Story)
पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केलेल्या चंद्रज्योती सिंह हिने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना कोणत्याही परीक्षेसाठी रणनीती बनवून त्यानुसार तयारी करण्याचा सल्ला दिला. जर तुम्ही तुमची तयारी सोपी ठेवली आणि तुम्ही बनवलेल्या रणनीतीनुसार अभ्यास केला तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल; असं ती सांगते.

दररोज 6 ते 8 तास केला अभ्यास
UPSC च्या तयारीसाठी तिने दररोज 6 ते 8 तास अभ्यास केला. याशिवाय जेव्हा परीक्षा जवळ आली तेव्हा तिने दिवसातून 10 तास किंवा त्याहून अधिक वेळ अभ्यास केला. इतर (IAS Success Story) विषयांच्या अभ्यासासोबतच ती रोज वर्तमानपत्रे वाचत राहिली आणि दैनंदिन चालू घडामोडींची तयारी करत राहिली, त्यामुळे तिला परीक्षा पास करणे सोपे झाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Interview Tips : UPSC/MPSC मुलाखत देताना ‘हे’ करु नका; पहा उपयोगी टिप्स

Interview Tips (3)

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा (Interview Tips) परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यातील मुलाखतींच्या तारखा जाहीर केल्या आहेत. वेळापत्रकानुसार येत्या जानेवारी-फेब्रुवारीमध्ये या मुलाखतीचे आयोजन केले जाईल. उमेदवारांनी मुलाखत फेरीत चांगली कामगिरी करावी यासाठी आज आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. उपयुक्त टिप्ससाठी पुढे वाचत रहा…

छोट्या छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या
मुलाखतीवेळी उत्तर देण्यापुर्वी प्रश्न काळजीपूर्वक ऐका आणि नंतर साध्या आणि सरळ शब्दात उत्तरे द्या. अनावश्यकपणे उत्तरे देणे टाळा कारण ते तुमच्यातील अनिश्चितता आणि आत्मविश्वासाची कमतरता दर्शवू शकतात. त्यामुळे तुम्हाला उत्तराबाबत जेवढी माहिती आहे तेवढीच माहिती द्या. या छोट्या छोट्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
मतभेद व्यक्त करताना नम्रता दाखवा
पॅनेलच्या सदस्याने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीशी तुम्ही असहमत असल्यास, कृपया त्याबाबत तुम्ही नम्रपणे सांगा. दीर्घकाळ वाद घालणे टाळा. मुलाखत पॅनेल वरील सदस्यांना सन्मान द्या.

कोणत्याही विषयावर नकारात्मक टीका करु नका
खाजगी क्षेत्रातील कोणत्याही किंवा सरकारी, यंत्रणा तसेच इतर कोणत्याही क्षेत्राबाबत तुम्हाला तुमची प्रतिक्रिया विचारण्यात आली तर त्यावर नकारात्मक टिप्पणी (Interview Tips) करु नका. त्यासंबंधित काही सूचना किंवा उपाय सुचवा. थेट टीका तुमच्या प्रतिमेवर परिणाम करु शकते.

आत्मविश्वास ठेवा (Interview Tips)
कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत उत्तीर्ण होण्यासाठी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यातील आत्मविश्वास. तुम्हाला तुमच्या तयारीबद्दल पूर्ण विश्वास असायला हवा, कारण अनेकदा असे घडते की उमेदवारांच्या तयारीत कोणताही दोष नसतो, पण विचारातील अस्वस्थतेमुळे चुकीची उत्तरे दिली जावू शकतात. त्यामुळे घाबरणे टाळा आणि आत्मविश्वासाने सामोरे जा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Education : पहिलीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ‘शेतीचे’ धडे; शिक्षणमंत्र्यांनी केली घोषणा

Education (12)

करिअरनामा ऑनलाईन । नव्या शैक्षणिक वर्षापासून (Education) शिक्षण क्षेत्रात नवे बदल केले जाणार आहेत. या धर्तीवर इयत्ता पहिलीपासून अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश केला जाणार आहे; अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे.
पहिलीपासूनच शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. त्यामुळे पहिलीच्या वर्गापासून विद्यार्थ्यांना आता शेतीचे धडे मिळणार आहेत. दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या दौऱ्यावर असताना मंत्री केसरकर यांनी ही घोषणा केली. कृषी शिक्षण काळाजी गरज झाली आहे. त्याचबरोबर भविष्यातील गरज ओळखून पहिलीपासूनच आता विद्यार्थ्यांना कृषी विषयाचे धडे दिले जाणार आहेत, असं मंत्री केसरकर म्हणाले.

शेती व निसर्गाचे धडे दिले जाणार (Education)
केसरकर म्हणाले की, निसर्गाची सध्या मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यामुळे भविष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच शेती व निसर्गाचे धडे दिले जाणार आहेत. मुलांमध्ये जर निसर्गाची आवड निर्माण करायची असेल तर कृषी शिक्षणाला पर्याय नाही म्हणून आता पहिलीपासून कृषी हा विषय अनिवार्य केला जाणार आहे.
केसरकर यांनी सांगितलं की, आगामी शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीपासून कृषी शिक्षण सुरु करण्याचा सरकारचा विचार आहे. कृषी शिक्षणासाठी शिक्षण विभागाने नवा मसुदा तयार (Education) केला आहे. या नव्या विषयाचा अभ्याक्रमात समावेश करण्यापूर्वी शिक्षकांना देखील याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. अनेक शिक्षकांनी कृषी विषयाचं शिक्षण घेतलेलं नसतं, कोणी बीएस्सी बीएड केलं आहे, कोणी बीए बीएड केलं आहे, तर कोणी एचएससी डीएड केलं आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना देखील कृषी विषयाचं प्रशिक्षण दिले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

GK Updates : मुलाखतीत विचारले जाणारे ‘हे’ प्रश्न तुम्हाला भंडावून सोडतील

GK Updates 24 Dec.

करिअरनामा ऑनलाईन ।अनेक उमेदवार वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची (GK Updates) तयारी करत असतात. UPSC/MPSC द्वारे घेण्यात येणारी परीक्षा उत्तीर्ण होणं हे देशातील लाखो तरुणांचं स्वप्न आहे. या परीक्षेसाठी तरुण जीवतोड मेहनत घेतात. दरवर्षी देशातील लाखो तरुण सरकारी अधिकारी होण्यासाठी अर्ज करतात. परंतु त्यापैकी फारच कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. इतर परीक्षांच्या तुलनेत स्पर्धा परीक्षा अत्यंत अवघड मानली जाते. परीक्षेच्या तीन टप्प्यांमधील तिसरा आणि अत्यंत अवघड मानला जाणारा टप्पा म्हणजे, मुलाखतीचा टप्पा. UPSC, MPSC तसेच इतर सरकारी नोकर भरतीच्या मुलाखतीत आणि लेखी परिक्षेत सामान्य ज्ञानाशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातात. जाणून घेऊया असेच काही प्रश्न आणि त्याची उत्तरे.

प्रश्न 1. ‘तोता-ए-हिंद’ या टोपणनावाने ओळखले जाते?
उत्तर : अमीर खुसरो
सवाल 2. दुनिया का सबसे युवा देश कौन सा है?
जवाब: दक्षिण सूडान
प्रश्न 3. Alphabet मध्ये  किती अक्षरे आहेत?
उत्तर: 8 (GK Updates)

प्रश्न 4. शरीराच्या कोणत्या भागाला घाम येत नाही?
उत्तरः ओठांवर
प्रश्न 5. कोणत्या प्राण्याला स्पर्श होताच मरतो?
उत्तर: टिटोनी पक्षी
प्रश्न 6. आंतरराष्ट्रीय कामगार दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: दिनांक १ मे
प्रश्न 7. गिरनार टेकड्या कोठे आहेत?
उत्तर (GK Updates) : गुजरात
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com