अभिमानास्पद ! ना IIT, ना कोणती डिग्री, कोल्हापूरच्या अमृताला थेट 41 लाखांचं पॅकेज

कोल्हापूर – कोल्हापूरच्या अमृता कारंडे या विद्यार्थिनीची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. अमृता राज्यभर चर्चेचा विषय बनण्याचं कारणं म्हणजे तिने मिळवलेले यश. अमृता कारंडे सध्या कोल्हापूरमधील केआयटी कॉलेजची विद्यार्थिनी आहे. सध्या इंजिनिअरिंगला बरे दिवस नाहीत, असं चित्र संगळीकडं आहे. मात्र, अमृतानं कोणत्याही विषयाचा अभ्यास सकारात्मकपणे आणि सातत्यानं केला की यश आपल्यापासून दूर राहत नाही हे सिद्ध करून दाखवले आहे. कोल्हापूरच्या अमृताला जगप्रसिद्ध अडोब कंपनीनं 41 लाखांचं पॅकेज दिले आहे. अमृताने मिळवलेल्या यशाची सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे.

इंजिनिअरिंग चेष्टेचा विषय, पण अमृतानं करुन दाखवलं
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या वाढल्यानं मोठ्या संख्येने इंजिनिअरिंग उत्तीर्ण असलेले विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं त्यांना नोकरी मिळणं अवघड झाले आहे. इंजिनिअरिंगची महाविद्यालय देखील ओस पडू लागली होती. इंजिनिअरिंग हा सध्या सगळीकडेच चेष्टेचा विषय बनला आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. आता इंजिनिअरिंग मराठी भाषेतून देखील शिकवण्यात येणार आहे. मात्र अशा परिस्थितीत इंजिनियरिंग क्षेत्रातही मोठ्या संधी असू शकतात हे कोल्हापुरातल्या केआयटी कॉलेजची विद्यार्थिनी अमृता कारंडे हिने दाखवून दिले आहे. मध्यम वर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अमृताला अडोब या एका प्रसिद्ध कंपनीने एक दोन नाही तर तब्बल वार्षिक 41 लाखांच्या वार्षिक पॅकेजवर करारबद्ध केलंय.

मोठं पॅकेज असणारी पहिलीच प्लेसमेंट
आयआयटी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना इतक्या पगाराच्या नोकऱ्या सहज उपलब्ध होतात. मात्र ,इंजिनिअरिंग शिक्षण घेत असतानाच इतक्या मोठ्या रकमेची प्लेसमेंट महाराष्ट्रात कदाचित पहिल्यांदाच होत आहे. अमृता कारंडे सध्या कोल्हापुरातील ‘केआयटी’ महाविद्यालयात तृतीय वर्षात शिकत होती. नुकतेच तिने चौथ्या वर्षात पदार्पण केले आहे.

अमृतानं कशाप्रकारे मिळवलं यश ?
अमृता कारंडे तृतीय वर्षात शिक्षण घेत असतानाच ‘ॲडोब’ कंपनीने ‘C कोडिंग’ ही देशस्तरावरील अभिनव स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेमध्ये तिने उत्तम कामगिरी केल्यामुळे तिची अडीच महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली होती. या इंटर्नशिप दरम्यान तिला मासिक 1 लाख रुपये शिष्यवृत्तीही मिळत होती. या इंटर्नशिप दरम्यान घेण्यात आलेल्या विविध चाचणी परीक्षांमधून तिने आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली होती. तिने दाखवलेले कौशल्य प्रमाणभूत धरून ”ॲडोब कंपनीने तिला ही खास प्रीप्लेसमेंटची ऑफर दिली आहे. ही प्लेसमेंट देशपातळीवरील विशेष म्हणून गणली जाते. अमृता आता ॲडोब कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून रुजू होणार आहे. अमृतानं मिळवलेल्या यशाबद्दल केआयटी कॉलेज कोल्हापूरचे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जींनी तिचे कौतुक केले आहे. तसेच त्यांनी अमृताला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत.

नोकरी आणि करिअर अपडेट् थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com