औरंगाबाद मध्ये 24 ते 26 जून दरम्यान रोजगार मेळाव्याचे आयोजन; मुलाखतींद्वारे मिळणार थेट नोकरी

करिअरनामा ऑनलाईन | जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र , औरंगाबाद यांच्यामार्फत ऑनलाइन पद्धतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक 24 ते 26 जून 2020 दरम्यान करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाकडील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून यामधील मुलाखती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ( स्काइप, व्हाटसप इ.द्वारे )घेण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे.

मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व उपभोक्तांकडून रिक्त पदे www. rojgar. mahaswayam.gov.in पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहेत. यासाठी सदर वेब पोर्टल वर नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे निकष पूर्ण होणाऱ्या किंवा ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखती घेण्यात येणार आहेत . या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी लॉग इन करावे . तसेच ज्या नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केलेली नाही त्यांनी www. rojgar. mahaswayam.gov.in वर तर अँड्रॉइड मोबाईल धारकांनी प्लेस्टोअरमधून mahaswayam ॲप मोफत डाउनलोड करून नोंदणी करावी . तसेच लॉगिन करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अर्ज करावे.

भरती इच्छुक नियोक्ते यांनी जास्तीत जास्त रिक्त पदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर ऑप्शनवर क्लिक करून औरंगाबाद ऑनलाईन जॉब शहर 1 (2020-21) यावर त्यांच्याकडील रिक्त पदे अधिसूचित करावी. तसेच मनुष्यबळाच्या मागणीची जाहिरात व प्रसिद्धी या विभागाच्या वेब पोर्टलवर विनामूल्य करावी . याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0240 24 24 859 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. जास्तीत जास्त भरती इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा , असे आवाहन एन.एन.सूर्यवंशी, सहाय्यक आयुक्त ,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, औरंगाबाद यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com