‘या’ राज्यात पाचवीपर्यंत ऑनलाईन शिक्षणाला बंदी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचे थैमान सुरु असताना विविध मार्गानी या परिस्थितीतून बाहेर पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. विविध मार्गानी देशातील विविध क्षेत्रात काम सुरु ठेवले जात आहे. शक्य असेल तिथे ऑनलाईन पद्धतीचा अवलंब केला जात आहे. शिक्षणक्षेत्रातही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून विविध राज्यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धती राबविण्याचे ठरविले आहे. महाराष्ट्र राज्यात आकाशवाणी व दूरदर्शनवरून शिक्षण दिले जाणार आहे. अशावेळी कर्नाटक राज्याने मात्र शिशुवर्गापासून पाचवीपर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणाला बंदी घातली असल्याची माहिती समोर  आहे.

अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षक हे गेल्या बऱ्याच दिवसापासून या शिक्षणपद्धतीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये तसेच त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विविध ठिकाणी या पद्धती अंगवळणी पाडल्या जात आहेत. कर्नाटक सरकारने शिशुवर्गापासून पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाला बंदी घातल्यामुळे असे शिक्षक, पालक, विद्यार्थी ज्यांना ही पद्धत अवघड वाटते आहे त्या साऱ्यांसाठीच हा एक  महत्वपूर्ण निर्णय ठरला आहे.

NIMHANS यांनी दिलेल्या एका अहवालानुसार विद्यार्थी आणि पालक यांच्या तक्रारींचा आढावा घेऊनच शिक्षण विभागाने तातडीने हा निर्णय घेतला असल्याचे समजते.  तसेच ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून पैसे उकळणाऱ्या संस्थांना आपले दुकान ताबडतोब बंद करण्याचे आदेश कर्नाटक सरकारने दिले आहेत.  राज्यातील पालकांची या काळात कोसळलेली आर्थिक स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातही सध्या ऑनलाईन शिक्षण पद्धतीबद्दल बरीच साशंकता आहे. आता येणाऱ्या काळातच याची स्पष्टता होऊ शकेल.

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com