YCMOU Admission 2021 | यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 1 जुलै 2021 पासून ते 31 ऑगस्ट 2021 दरम्यान होणार आहे.यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यभरात 5000 अभ्यास केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सर्व अभ्यासक्रमांना महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी अभ्यास केंद्रामार्फत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे आपला प्रवेश निश्चित करू शकतो. यशवंतराव चव्हाण विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थी खालील अभ्यासक्रमना अर्ज करू शकतात – बी.ए., एम.ए., बी.कॉम. शिक्षणशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, पत्रकारिता पदवी/पदविका, सहकार व्यवस्थापन, शालेय व्यवस्थापन, आरोग्यमित्र प्रमाणपत्र, रुग्ण सहायक प्रमाणपत्र, बालसंगोपन प्रमाणपत्र इत्यादी. या विद्यापीठ अंतर्गत विद्यार्थ्यांना आपली नोकरी तसेच व्यवसाय करत असताना आपले शिक्षण पूर्ण करू शकतात.तसेच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन भरलेल्या शैक्षणिक शुल्कामधूनच पुस्तके, साहित्य, अभ्यास केंद्रामार्फत उपलब्ध करून दिले जाते.

प्रवेश प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती आपण मुक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवरन घेऊ शकता – http//ycmou.digitaluniversity.ac
तसेच काही मदत किंवा माहिती हवी असल्यास पुणे विभागीय केंद्राच्या खालील क्रमांकावर फोन करून माहिती मिळवू शकता – 020- 24491107, 020- 24457914

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.