NTPC Recruitment : सरकारी नोकरी!! NTPC अंतर्गत ‘या’ पदावर भरती सुरु; पात्रता फक्त 10 वी पास

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC Recruitment) अंतर्गत लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून कारागीर प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 32 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज कारायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2023 आहे.

संस्था – नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
भरले जाणारे पद –
कारागीर प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 32 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मार्च 2023
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (NTPC Recruitment)

  1. उमेदवारांनी 10 वी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  2. उमेदवारांनी संबंधित पदांनुसार ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  3. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – 21,500/- रुपये दरमहा

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume (NTPC Recruitment)
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याचा पत्ता –
एचओडी, मानव संसाधन विभाग मौदा सुपर थर्मल पॉवर स्टेशन मौदा-रामटेक रोड, पोस्ट मौदा, जिल्हा नागपूर, पिन – 441104 (NTPC Recruitment)
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF  
अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/en

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com