अमेरिकेत शिक्षणासाठी व्हिसा निर्बंध संपुष्टात; बायडन सरकारचा दिलासादायक निर्णय

करिअरनामा ऑनलाईन | अमेरिकेमध्ये शिक्षणासाठी आलेल्या परदेशी विद्यार्थ्यांच्या राहण्यावर ट्रम सरकारने घातलेली बंदी, जो बाईडन यांचा सरकारने संपुष्टात आणली आहे. त्यामुळे, आता जोपर्यंत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे तोपर्यंत विद्यार्थी अमेरिकेत राहू शकणार आहे. त्याला व्हिसा साठी अर्ज करण्याची गरज नाही.

अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वास्तव्यासाठी यापुढे कोणत्याही प्रकारचा विसा लागणार नाही. अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाने व्हिसा निर्बंध संपुष्टात आणण्याची घोषणा केली. ट्रम्प यांच्या काळामध्ये परदेशी विद्यार्थ्यांना किमान दोन आणि कमाल चार वर्ष वास्तव्यासाठी व्हीसा देण्यात येत होता.

परदेशी विद्यार्थ्यांच्या वास्तव्याच्या संदर्भात घेण्यात आलेल्या निर्णया सोबतच बाइडन सरकारने अजून काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये, अमेरिकेच्या निवृत्त सिमेवर विस्थापितांना रोखण्यासाठी भिंत बांधण्यात येणार होती. त्या भिंत बांधण्याच्या माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निर्धारित केलेला निधी यापुढे अमेरिकेच्या जनतेसाठी देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांसाठी वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com