खासगी वैद्यकीय महाविद्यालयांकडून यंदा शुल्कवाढ नको – अमित देशमुख

करिअरनामा ऑनलाईन ।कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीमुळे राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी कोणतीही शुल्कवाढ करू नये,असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केली आहे.

मंत्रालयात वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि दंत महाविद्यालय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी वैद्यकिय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने,एसएनबीटी एज्यकेशन ट्रस्टचे डॉ.हर्षल तांबे यांच्यासह इतर सद्यस्य उपस्थित होते.

कोरोनामुळे सर्वानाच आर्थिक संकटांचा करावा लागत आहे.त्यांचा विचार करून खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी यावर्षी विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कामध्ये कोणतीही वाढ करू नये.सध्याच्या परिस्थतीत विद्यार्थ्यांवर शुल्कवाढीचा बोजा लादणे योग्य होणार नाही.या संदर्भात आपण उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशीही चर्चा करणार आहोत,असे त्यांनी सांगितले.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com