यूपीएससीची वयोमर्यादा ३० वरून २७ येणार? नीती आयोगाची मागणी

Get real time updates directly on you device, subscribe now.

नवी दिल्ली | स्पर्धापरिक्षा करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर अनेक तरुण स्पर्धापरिक्षांचा अभ्यास करुन आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यापर्श्वभूमीवर वाढती स्पर्धा लक्षात घेऊन निती आयोगाने यूपीएससीची वयोमर्यादा ३० वरून २७ वर आणण्याची मागणी केली आहे.

नीती आयोगाने ‘स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया’ अंतर्गत धोरणात्मक अहवाल जारी केला आहे. या अहवालात नीती आयोगाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची वयोमर्यादा ३० वरून २७ करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. आयोगाने जारी केलेल्या अहवालात, ‘लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बदल करण्याची तसेच नवीन अधिकार्‍यांची नियुक्‍ती, प्रशिक्षण आणि निवड परीक्षेत काही आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे’ असे म्हटले आहे.

सध्या देशात ६० हून अधिक प्रशासकीय सेवा उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्व नागरी सेवांसाठी एकत्रित परीक्षा घेण्याची सूचनाही नीती आयोगाने केली आहे. सर्वसाधारण गटातील उमेदवारांना यूपीएससी परीक्षेसाठी अद्याप ३० वर्षांपर्यंतची वयोमर्यादा आहे. मात्र, ती २०२२-२३ पासून २७ पर्यंत करावी, अशी सूचना नीती आयोगाने केली आहे.

हे पण वाचा -
1 of 53

नोकरी आणि करिअर संबंधी अपडेट्स मिळवण्याकरता आजच आमचा WhatsApp आणि Telegram चॅनल जाॅइन करा.

WhatsApp ग्रुपल जाॅइन व्हा
Join WhatsApp Group

आमचा Telegram चॅनल जाॅइन करा
Join Telegram

Get real time updates directly on you device, subscribe now.