NHM Recruitment 2022 : मालेगाव महानगर पालिकेत ‘या’ पदावर होणार भरती; अर्ज करायला उशीर नको

करिअरनामा ऑनलाईन । राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक परिमंडळांतर्गत (NHM Recruitment 2022) येणाऱ्या मालेगाव महानगरपालिका येथे आरोग्य विभागात विविध पदांवर भरती होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून बालरोगतज्ज्ञ, प्रसूतितज्ज्ञ/ स्त्रीरोगतज्ज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, ANM, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण 38 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी प्रत्येक मंगळवारी सकाळी 11.30 वाजता दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.

विभाग – मालेगाव महानगरपालिका, आरोग्य विभाग

पदाचे नाव – बालरोगतज्ञ, प्रसूतितज्ज्ञ / स्त्रीरोगतज्ज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, ANM, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

पद संख्या – 38 जागा (NHM Recruitment 2022)

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघा.)

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 जुलै 2022

नोकरी ठिकाण – मालेगाव

अर्ज फी – (NHM Recruitment 2022)

खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-

वयोमर्यादा –

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता/ मुलाखतीचा पत्ता –  (NHM Recruitment 2022)

वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, मालेगाव महानगरपालिका, रामसेतु जवळ, मालेगाव –423203

(सूचना – इच्छुक उमेदवारांनी प्रत्येक मंगळवारी सकाळी 11.30 वाजता दिलेल्या पत्यावर मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे.)

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com