न्यायदंडाधिकारी परीक्षेत सोलापूरची अनिता राज्यात प्रथम

सोलापूर प्रतिनिधी | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्थर आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथील अनिता हवालदार राज्यात पहिली आली आहे.

मूळचे करमाळा तालुक्यातील चिकलठणा गावाचे रहिवासी असणारे हवालदार कुटुंबीय घरची हलाखीची परिस्थिती असल्याने कामाच्या शोधात माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे मागील 10 वर्षांपासून स्थायिक झाले आहेत.

सोलापूरच्या दयानंद विधी महाविद्यालयाची विद्यार्थी असलेल्या अनिताने दुसऱ्याच प्रयत्नात हे यश संपादन केलंय. अनिताचं प्राथमिक शिक्षण चिकलठाणा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर तर अकरावी-बारावी चं शिक्षण पंढरपूरच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात झालंय. वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी अनिताने हे यश मिळवून अनेकांनासमोर एक आदर्श घालून दिला आहे.

हे पण वाचा -
1 of 10

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

%d bloggers like this: