साताऱ्यातील भूमिपुत्रांना नोकरीची सुवर्णसंधी..!! औद्योगिक कंपन्यांमध्ये भरती सुरु !! त्वरा करा..!!

करिअरनामा ऑनलाईन | कोरोना संकटाच्या काळात अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. अनेकांनी आपल्या सुरक्षिततेसाठी मोठ-मोठाली शहरं दूर करुन गड्या आपला गाव बरा म्हणत गावांना जवळ केलं. इतर राज्यांतील कामगार वर्गानेही आपल्या घरच्यांची आणि स्वतःच्या जीवाची काळजी लक्षात घेऊन मिळेल त्या पद्धतीने गाव गाठण्याचा प्रयत्न केला. कष्टकरी आणि श्रमिक वर्गासाठी मागील ३ महिने हे आत्यंतिक हलाखीचे राहिले असले तरी आता झालेल्या प्रकारावर शोक व्यक्त करण्याऐवजी काम करणं, त्यावर उपाय शोधणं जास्त गरजेचं आहे.

साताऱ्यातील औद्योगिक क्षेत्रात अशाच पद्धतीने काम उपलब्ध करुन देण्यासाठी उद्योजकांनी आणि जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी पुढाकार घेतला आहे. वाढणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासोबतच रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करुन देण्यासाठी एक नवीन उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरु करण्यात आला आहे. विशेषतः पुण्या-मुंबईहून स्वगृही परतलेल्या मुला-मुलींच्या मोबाईल नंबरवर एका संदेशाद्वारे जिल्ह्यातील नवीन रोजगाराच्या संधींची माहिती देणारी लिंक पाठवण्यात आली आहे.

करिअरनामाच्या वाचकांसाठी सातारा जिल्ह्यातील नोकरीसाठी लिंक – https://bit.ly/3dLLA1j

या लिंकवर क्लिक करुन सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांत उपलब्ध असणाऱ्या कंपन्या, त्या कंपन्यांमध्ये शिल्लक असणाऱ्या जागा, कामाचं स्वरुप याविषयीची माहिती मिळू शकते. स्वतः जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी याबाबतीत लक्ष घातलं असून यासंदर्भात ‘महास्वयम’ पोर्टलवर नावनोंदणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. नोकरीसाठी इच्छुक नागरिकांनी अडचण आल्यास 02162-239938 (कार्यालय), 8999089322 (दीपक लोंढे), 9371608764 (सहकारी) या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे.