NEET परीक्षेच्या रजिस्ट्रेशनची तारीख वाढली

करिअरनामा । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) मंगळवारी राष्ट्रीय पात्रता कम एन्ट्रन्स टेस्ट २०२० चा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख एका आठवड्यामध्ये वाढविली आहे. एनईईटी (यूजी) 2020 अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2019 (रात्री 11:50 पर्यंत) होती.  मात्र ही तारीख 6 जानेवारी 2020 (रात्री 11:50) पर्यंत वाढविण्यात आली आहे.

तसेच ऑनलाईन अर्जाचा तपशील दुरुस्त करण्याची तारीख 15 जानेवारी 2020 ते 31 जानेवारी 2020 (रात्री 11.50 पर्यंत) राहील. काश्मीर खोरे, लेह आणि कारगिलमधील उमेदवार (एनएटीए) विहित नोडल केंद्रांवर 6 जानेवारी 2020 पर्यंत ऑफलाइन अर्ज दाखल करु शकतात.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) जाहीर केलेल्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार ज्या उमेदवारांनी एनईईटी यूजी प्रवेश परीक्षेसाठी अंतिम मुदतीपूर्वी अर्ज केले होते, त्यांना आपल्या अर्जात सुधारणा करता येऊ शकते. एनईईटी यूजी 2020 प्रवेशपत्र 27 मार्च 2020 रोजी जाहीर होईल आणि 3 मे 2020 रोजी एनईईटी यूजी प्रवेश परीक्षा घेईल. त्याचवेळी, प्रवेश परीक्षेचा निकाल 4 जून 2020 पर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]