राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३७ व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा उत्साहात पार

करीअरनामा । राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १३७ व्या तुकडीचा आज दीक्षान्त संचलन सोहळा पार पडला. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या दीक्षांत संचलनाची मानवंदना स्वीकारली. यावेळी ‘एनडीए’चे कमाडंट एयर मार्शल आय.पी.विपिन, डेप्युटी कमाडंट रिअर अडमिरल एस के ग्रेवाल उपस्तिथ होते. २८४ केडेट्स यावर्षी येथून उत्तीर्ण होऊन देशसेवेसाठी वायुदल, नौदल व भूदल यांमध्ये सहभागी होतील.

सकाळच्या थंडीत ‘एनडीए’ कैडेट्सने संचलनाचा सराव सुरु केला होता. बरोबर सकाळी ०७:१५ ला खेत्रपाल मैदानाचा दरवाजा उघडला आणि कॅडेटच्या घोषनांनी मैदान दुमदुमुन गेले. एकदम शिस्तबद्ध पावलांनी, खणखणित आवाजात संचलन झाले. संचलन बघण्यासाठी उपस्थित असलेल्या प्रेक्षक, पालकवर्ग व नातेवाईक यांच्याकडून त्यांचे हे क्षण टिपले जात होते.

यावेळी हेलीकॉप्टर , सुखोई व मिग विमानांचे ‘फ्लाय पास्ट’ झाले. प्रचंड ऊर्जा भरलेल्या ह्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा दीक्षांत संचलन सोहळा पार पडला. सोहळा पार पडल्यानंतर सारंग हेलीकॉप्टरचा थरार उपस्थित प्रेक्षकांना अनुभवयाला मिळाला. यांमध्ये निशांत विश्वकर्मा, सुमंत कुमार, अनुराग पांडेय व माझी गिरिधर या विद्यार्थांना गौरविण्यात आले.


English


Pune correspondent | The 137th Division of the National Defense Academy (NDA) passed the convocation ceremony today. Defense Minister Rajnath Singh accepted the conviction of the convoy in this convocation. The NDA’s Commandant Air Marshal IP Vipin, Deputy Commandant Rear Admiral SK Grewal was present on the occasion. Three cadets will pass this year and join the Air Force, Navy and Marine Corps for service.

In the cold of the morning, the NDA cadets had started the practice of circulation. The gate of Khetpal Maidan was opened at 8:30 am and the cadet’s announcements swept the field. With very disciplined steps, the sound of the tune was circulated. These moments were being remembered by the audience, parents and relatives present to watch the movement.

Helicopters, Sukhoi and MiG planes fly ‘past’ at this time. The event was filled with enormous energy. After the ceremony, the audience of the Sarang helicopter got to experience the thrill. Among them, students from Nishant Vishwakarma, Sumant Kumar, Anurag Pandey and Maji Giridhar were honored.