….म्हणून यादिवशी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करतात; जाणून घ्या संपूर्ण माहिती

करीअरनामा दिनविशेष । किसान दिन किंवा राष्ट्रीय शेतकरी दिन हा 23 डिसेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. सदर दिवस चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिवस असून त्यांनी शेतकरी वर्गासाठी केलेल्या प्रयत्न यांमुळे हा दिवस साजरा करण्यात येतो.

२००१ साली भारत सरकारने दरवर्षी 23 डिसेंबर रोजी किसान दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांचे समाजातील महत्त्व आणि देशाचा सर्वांगीण आर्थिक आणि सामाजिक विकास याविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी किसान दिन साजरा केला जातो.

चौधरी चरण सिंह यांनी देशातील शेतकर्‍यांचे जीवन व परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक धोरणांची ओळख करून दिली. त्यांनी शेतकरी सुधारणांची बिले आणून देशाच्या कृषी क्षेत्रात अग्रणी भूमिका बजावली.

———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-