सुवर्णसंधी ! मुंबई महानगर पालिकेत ८७४ लिपिक पदांची भरती

करिअरनामा ।  कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीनंतर मुंबई महापालिकेत आता महाभरती होणार आहे. लिपिक अर्थात कार्यकारी सहाय्यक पदाच्या ८७४ जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत. याबाबतची ऑनलाइन परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परीक्षेच्या प्रक्रियेसाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

भरतीसाठी पालिकेने महाऑनलाइन लिमिटेड कंपनीची निवड केली असून, पदांची भरती सरळसेवेत करण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवणे, संगणकीय ज्ञानाची परीक्षा, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाइन परीक्षेसह इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाची ऑनलाइन व्यावसायिक चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. उद्या, बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

पालिकेत कार्यकारी सहाय्यक वर्गाची एकूण ५२५५ पदे आहेत. त्या पदांपैकी सरळसेवा पद्धतीने ३२२१ पदे भरायची आहेत. त्यातील सरळसेवे पैकी रिक्त असलेली ८७४ पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे खुल्या आणि आरक्षित प्रवर्गात एकूण तीन हजार अर्ज येणे अपेक्षित आहेत. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडून प्रत्येकी ५०० रुपये शुल्क घेतले जाणार असून, मागास व इतर मागास प्रवर्गातील उमदेवारांकडून प्रत्येकी ३०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. सर्व उमेदवारांचे ऑनलाइन पद्धतीचे अर्ज मागवण्यासाठी अर्जाचा नमुना महाऑनलाइनच्या महारिक्रुटमेंट या वेबसाइटवर अपलोड केला जाणार आहे. याची लिंक मुंबई महापालिकेच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.