Multinational Education : खुशखबर!! आता मिळेल Multinational Education ची संधी; काय आहे पात्रता?

करिअरनामा ऑनलाईन। एस. पी. जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट ही (Multinational Education) जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेची व्यवस्थापन शिक्षण संस्था आहे. संस्थेचे पहिले कॅम्पस दुबईत सुरू झाले. दुसरे सिंगापूर, त्यानंतर सीडनी तर चौथे कॅम्पस मुंबईत सुरू झाले. त्यानंतर आता संस्थेने भरारी घेत लंडनमध्ये कॅम्पसची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत पुढीलवर्षी सप्टेंबरपासून शिक्षण सुरू होईल, असे संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष नितीश जैन यांनी बुधवारी घोषित केले.

मुंबईतील विद्यार्थ्यांना आता बहुदेशीय शिक्षणाची संधी मिळणार आहे. सुप्रसिद्ध एस. पी. जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंटने लंडन येथे कॅम्पस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पुढील वर्षीपासून शिक्षण सुरू होणार आहे.

एस. पी. जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंट ही जागतिक (Multinational Education) स्तरावरील प्रतिष्ठेची व्यवस्थापन शिक्षण संस्था आहे. संस्थेचे पहिले कॅम्पस दुबईत सुरू झाले. दुसरे सिंगापूर, त्यानंतर सीडनी तर चौथे कॅम्पस मुंबईत सुरू झाले. त्यानंतर आता संस्थेने भरारी घेत लंडनमध्ये कॅम्पसची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत पुढीलवर्षी सप्टेंबरपासून शिक्षण सुरू होईल, असे संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष नितीश जैन यांनी बुधवारी घोषित केले.

‘लंडन शहराच्या कॅनरी व्हार्फसारख्या प्रतिष्ठीत भागात व आजूबाजूला सर्व मोठ्या तसेच वित्त क्षेत्रातील जगविख्यात मातब्बर कंपन्यांचे मुख्यालय असलेल्या भागात हे कॅम्पस (Multinational Education) आहे. त्याखेरीज संस्थेतून शिकलेले 80 विद्यार्थी या मोठ्या कंपन्यांत असल्याने त्या सर्वांशी संस्था संलग्न आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल’, असे नितीश यांनी सांगितले.

संस्थेच्या लंडन कॅम्पसला युनायटेड किंगडमच्या शिक्षण विभागाची अधिस्वीकृती आहे. याअंतर्गत तंत्रज्ञान विषयातील स्नातकोत्तर पदवी, डेटा विज्ञानसारख्या विषयातील बीबीए, कार्यकारी एमबीए, व्यवस्थापन तंत्रज्ञान विषयातील पदवी असे आगळे अभ्यासक्रम तेथे शिकवले जाणार आहेत.

‘लंडन कॅम्पस सुरू झाल्यानंतर आता संस्थेच्या अन्य कुठल्याही कॅम्पसमधील विद्यार्थी एक वर्षानंतर या पाचही कॅम्पसमध्ये बहुदेशीय पद्धतीचे शिक्षण घेऊ शकतील. संस्था युरोपातील जवळपास प्रत्येक विद्यापीठाशी विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रमासाठी संलग्न आहे. यामुळे येत्या (Multinational Education) काळात एस. पी. जैन खऱ्या अर्थाने ग्लोबल स्कूल होईल. जगाच्या कुठल्याची कानाकोपऱ्यात ते असेल’, असा विश्वास नितीश यांनी यावेळी व्यक्त केला.

नितीश यांच्या पत्नी बापसी जैन, मुलगा गौरव जैन, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वीरा जोशी यांच्यासह ब्रिटिश उच्चायुक्तातील अधिकारी, एस. पी. जैन स्कूल ऑफ ग्लोबल मॅनेजमेंटचे माजी विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आदी यावेळी उपस्थित होते.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com