MPSC ने घेतला महत्वाचा निर्णय; परिक्षेचा अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ट्विटरवरुन एक महत्त्वाची माहिती दिली आहे. आयोगाने म्हटलंय की, प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे.

तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल. संकेतस्थळावर अर्ज सादर करण्यासाठी तांत्रिक अडचण येत आहे. त्यामुळे उमेदवारांना अर्ज भरण्यात मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत.

हे पण वाचा -
1 of 59

त्यामुळे त्यानंतर अनेक तक्रारी येऊ लागल्या. या तक्रारीअंती आता आयोगाने अर्ज भरण्याची ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली आहे. तांत्रिक अडचण दूर केल्यानंतर पुन्हा कळवण्यात येईल आणि त्यानंतर सर्वच जाहिरातींना अनुसरुन अर्ज सादर करण्यासाठी पुरेश मुदत देखील देण्यात येईल, असं आयोगाकडून कळवण्यात आलं आहे.