MPSC Success Story : टेन्शन फ्री अभ्यास करून मारली बाजी; जळगावचा तरुण MPSC मध्ये राज्यात अव्वल

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या (MPSC Success Story) सहाय्यक कक्ष अधिकारी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत जळगावच्या तरुणाने बाजी मारत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.  विशाल सुनील चौधरी असं या तरुणाचं नाव आहे. विशाल यांना या परीक्षेत 302 गुण मिळाले आहेत. तर STI परीक्षेत ओबीसी प्रवर्गामध्ये त्याने संपूर्ण राज्यात 8 वा क्रमांक मिळवला आहे. त्यांच्या या कार्याचे संपूर्ण शहरात कौतुक होत असून सर्व स्तरांवरून त्यांचे अभिनंदन होत आहे.

तलाठी पदावर केली नोकरी (MPSC Success Story)

विशाल चौधरी हे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील निमगाव येथे तलाठी म्हणून तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. विशाल यांचे वडील सुनील भाऊराव चौधरी पोलिस अधीक्षक कार्यालय जळगाव येथे पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. घरीच वेळ मिळेल तेव्हा अभ्यास (MPSC Success Story) करत विशाल यांनी हे यश मिळविले आहे. चाळीसगाव येथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर जळगावात मु. जे. महाविद्यालयात बारावी तर पदवीचे शिक्षण त्यांनी नूतन मराठा महाविद्यालयातून  पूर्ण केले आहे.

थोडक्यात हुकली UPSC ची संधी

पदवीचे शिक्षण घेत असतानाच युपीएससीचा अभ्यास सुरु केला होता. मात्र UPSC जमत नसल्याने 2017 पासून त्यांनी  MPSC चा अभ्यास सुरू केला. घरीच आपल्या पद्धतीने पुस्तके आणून त्यांनी अभ्यास केला. 2018 मध्ये त्यांनी UPSC द्वारे घेण्यात आलेली असिस्टंट कमांडरची परीक्षा दिली (MPSC Success Story) होती. ही परीक्षा त्यांनी उत्तीर्ण देखील केली मात्र मुलाखतीत काही गुणांनी संधी हुकली. या पयशामुळे खचून न जाता त्यांनी पुढे एमपीएससीचा अभ्यास सुरु ठेवला. 2019 मध्ये गट – क ची टॅक्स असिस्टंट जीएसटी विभाग, मंत्रालय लिपिक आणि तलाठी या तिन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आणि त्यांनी तलाठीची नोकरी स्वीकारली.

हे पण वाचा -
1 of 86

टेन्शन फ्री अभ्यास (MPSC Success Story)

तलाठी म्हणून रुजू झाल्यानंतर 2020 मध्ये विशाल यांनी पुन्हा MPSC चा अभ्यास सुरु केला. हा अभ्यास सुरु असताना  दोन महिन्यातच कोरोना आला आणि अभ्यासाला ब्रेक लागला. मात्र (MPSC Success Story) वर्षभरानंतर आठवड्यातून एक-दोन दिवस जसं  जमेल तसा अभ्यास केला. अभ्यासाचा ताण घेऊन, नोट्स काढून अभ्यास केला तर तो जमत नाही. त्यामुळे विशाल यांनी आपल्याला हवं तसं तणाव विरहित राहून अभ्यास केला. कोणत्याही नोट्स यासाठी काढल्या नसल्याचे त्यांनी यवेळी आवर्जून सांगितलं.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com