MPSC Success Story : आजोबांसारखंच अधिकारी होण्याचं ठरवलं अन् अभिषेक RTO परीक्षेत राज्यात अव्वल ठरला

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी (MPSC Success Story) बाळगून एमपीएससी परीक्षेसाठी विद्यार्थी अनेक वर्ष मेहनत घेतात. प्रचंड मेहनत घेऊन परीक्षांना सामोरं जातात. पण अनेकदा अपयश पदरी पडतं. पण काही यशोगाथा या प्रेरणादायी ठरतात. असंच यश कल्याणमधील अभिषेक सालेकर या तरुणाने मिळवलंय. योगायोगाने त्याच्या वाढदिवशीच एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभिषेक या परीक्षेत राज्यात पहिला आला होता. आई-वडील दोघंही शिक्षक. अभिषेक अभ्यासातही हुशार. पण आजोबांकडे पाहून त्याला आपणही अधिकारी व्हावं, असं वाटलं. त्यासाठी त्याने मेहनत घेतली. पण वाटेत अनेक अडचणी आल्या. पण त्याने हार नाही मानली. तो प्रामाणिकपणे प्रयत्न करतच राहिला.

संपूर्ण राज्यात ठरला अव्वल

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत कल्याणच्या वालधुनी परिसरात राहणाऱ्या अभिषेकने घवघवीत यश संपादन केलंय. अभिषेक सालेकर याने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. त्याने मिळवलेल्या यशाचं सर्वच स्तरातून कौतुक होतंय.

शिक्षक आई-वडिलांकडून अभिषेकला मिळालं बाळकडू (MPSC Success Story)

कल्याण पश्चिम वालधुनी परिसरात भास्कर सालेकर आणि त्यांची पत्नी श्रद्धा सालेकर हे मुलगा अभिषेक सोबत राहतात. भास्कर व श्रद्धा हे दोघंही शिक्षक. भास्कर बीएमसी शाळेमध्ये शिक्षक. तर श्रद्धा या खाजगी शाळेत शिक्षिका. त्यांचा मुलगा अभिषेक हा पहिल्यापासूनच अभ्यासात प्रचंड हुशार.

अभिषेकने दहावीच्या परीक्षेत 96 टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यानंतर अभिषेकने मागे वळून पाहिलेच नाही. मुळातच आई वडील दोन्ही (MPSC Success Story) शिक्षक असल्याने घरातूनच शिक्षणाचं बाळकडू अभिषेकला मिळालं होतं.

आजोबांचा घेतला आदर्श

लहानपनापसून आपले आजोबा मुकुंद दामले यांच्याकडे पाहून आपणही त्यांच्यासारखं सरकारी अधिकारी व्हावं, असं अभिषेकचं स्वप्न होतं. अधिकारी होवून जनसेवा करावी, अशी इच्छा अभिषेकची होती. आजोबा मुकुंद हे बीएआरसीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत होते. अभिषेकला आजोबांसारखंच अधिकारी व्हायचं होतं. यासाठी त्याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली.

कोरोनाने केला घोळ

अभिषेकने जिद्दीने अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत (MPSC Success Story) केलं. मॅकेनिकलपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर एमपीएससी स्पर्धा परीक्षांच्या तयारीला तो लागला. मार्च 2020 मध्ये त्याने परीक्षेची पहिली पायरी चढली. मात्र कोरोनाने घोळ केला. लॉकडाऊन लागलं आणि परीक्षा लांबणीवर गेली.

खाजगी कंपनीत केली नोकरी

पण अभिषेकने हार मानली नाही. परीक्षेची तयारी सुरूच ठेवली. त्याच बरोबर खाजगी कंपनीत नोकरीही सुरू केली. नोकरी सुरु असताना एमपीएससीच्या परीक्षा जाहीर झाल्या. परिवहन विभागातील सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक पदासाठी त्याने परीक्षा दिली.

दिवसातील 13 तास अभ्यासासाठी (MPSC Success Story)

नोव्हेंबर 2021 मध्ये ही परीक्षा होणार होती. अभिषेकने दिवसातील 13 तास अभ्यास केला. यामधे अभिषेकला त्याच्या आई वडिलांची साथ होतीच; त्याच बरोबर त्याच्या शिक्षकांचेही मार्गदर्शन मिळत होते. राज्यभरतून तब्बल 5 हजार मुलं या परीक्षेला बसली होती.

वाढदिवशी मिळाली आनंदाची बातमी

परीक्षा झाली आता प्रतीक्षा होती परीक्षेच्या निकालाची. विशेष म्हणजे अभिषेकच्या वाढदिवसादिवशी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. आपण चांगल्या मार्कने उत्तीर्ण होणार अशा विश्वास अभिषेक आणि त्यांच्या कुटुंबीयांना होता. मात्र राज्यात प्रथम क्रमांक मिळेल, असं वाटलं नव्हतं.

तिसरी पिढी प्रशासकीय सेवेत

या यशाबद्दल बोलताना अभिषेक याने नियमित व नियोजनबद्ध (MPSC Success Story) अभ्यासामुळे हे यश मिळाल्याचं म्हटलंय. आपल्या यशाचे श्रेय त्याने आपले आई-वडील, शिक्षक यांना दिलंय. कोकणातील खेड तालुक्यातील मुंबके गावातील आमच्या घराण्यातील तिसरी पिढी प्रशासकीय सेवेत दाखल होताना विशेष आनंद होत आहे, असंही तो म्हणला.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com