MPSC Success Story : दु:ख बाजूला ठेवून आईचं स्वप्न केलं साकार; राष्ट्रीय खेळाडू धनश्रीची PSI पदापर्यंत मजल

करिअरनामा ऑनलाईन। आयुष्यात संकटं येत राहतात. पण घाबरून न जाता संकटाशी दोन (MPSC Success Story) हात केले तर यश हे आपलंच असतं हे निश्चित. ही गोष्ट कोल्हापूरच्या धनश्री तोरस्करने सिद्ध करून दाखवली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत तिने स्पोर्ट्स कोट्यातून राज्यात पाचवा क्रमांक मिळवला आणि तिच्या दिवंगत आईचं स्वप्न साकार केलं. धनश्री रग्बी क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय खेळाडू आहे.

रग्बीची पहिली राष्ट्रीय खेळाडू

धनश्री विठ्ठल तोरस्कर ही कोल्हापुरातील बापट कॅम्प मधील रहिवासी आहे. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमधून झालं. त्यानंतर इंग्रजी या विषयातून तिने कमला कॉलेजमधून (MPSC Success Story) पदवी घेतली. त्यानंतर तिने MPSC चा अभ्यास सुरू केला. धनश्री ही कोल्हापुरातील रग्बीची पहिलीच राष्ट्रीय खेळाडू आहे. खेळ आणि अभ्यास याची योग्य सांगड घालून तीने अधिकारी होण्याचा खडतर प्रवास पूर्ण केला.

समांतर आरक्षणामुळे हुकली संधी (MPSC Success Story)

धनश्रीने 2013-14 सालापासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात ती पीएसआयची परीक्षा उत्तीर्ण झाली. पण दुर्दैवाने समांतर आरक्षणामुळे नंतर निकाल बदलला आणि अंतिम यादीतून तिचे नाव वगळण्यात आले.

तिसऱ्या प्रयत्नात मिळवलं यश

पहिल्या पर्यायत्नात एवढा मोठा धक्का बसल्यानंतर (MPSC Success Story) धनश्री खचली नाही. तिने पुन्हा नव्याने अभ्यासाची तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रयत्नात तिला अपयश आले. तरीही जिद्द न सोडता तिने तयारी सुरू ठेवली. तिसऱ्या प्रयत्नात मात्र धनश्रीने बाजी मारली.

PSI व्हावं ही आईची इच्छा

धनश्री ही जिम ट्रेनर म्हणून नोकरी करते. पण आपल्या मुलीनं पोलीस खात्यात अधिकारी व्हावं ही धनश्रीच्या आईची इच्छा. आईच्या इच्छेखातर धनश्रीने अभ्यास सुरू केला. दोन वेळा अपयश आल्यानंतरही ती खचली नाही. 2019 च्या मुख्य परीक्षेच्या एक महिना आधी धनश्रीच्या आईचे निधन झालं. हा धनश्रीसाठी मोठा आघात होता. मग आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी धनश्रीने कंबर कसली. दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही धनश्रीने मोठ्या हिमतीने अभ्यास केला आणि अधिकारी होण्याचं दिवंगत आईचं स्वप्न साकार केलं.

‘आईचं स्वप्न साकार करू शकल्याचं समाधान’

धनश्रीने मिळवलेल्या यशाबद्दल बोलताना ती म्हणते; “अधिकारी होऊन आईचं स्वप्न साकार करू शकल्याचं समाधान आहे. आईच्या निधनानंतर दुःखातून सावरणं कठीण होतं. मात्र दुःख कवटाळून न बसता जिद्दीने अभ्यास सुरु ठेवला. कोणतेही ध्येय ठरवलं आणि त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करून काम केलं तर यश हे नक्की मिळतं.” धनश्री तिच्या यशाचं श्रेय देताना म्हणते; ” माझ्या यशात दिवंगत आई मनीषा तोरस्कर, वडील विठ्ठल तोरस्कर, भाऊ राहुल तोरस्कर, बहिण पूनम मोहिते तसेच (MPSC Success Story) मामा संजय घाटगे यांचं मोलाचं योगदान आहे. अभ्यासासाठी मला जमीर मुल्ला यांचं मार्गदर्शन लाभलं. शारीरिक चाचणीसाठी क्रीडा मार्गदर्शक सुभाष पवार आणि दिग्विजय मळगे तसेच कोल्हापूर रग्बी असोसिएशनचे सचिव दीपक पाटील यांनी मार्गदर्शन केले. या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे मला इथपर्यंत पोहचता आलं.”

‘कोचिंग क्लास परवडणारे नव्हते’

धनश्री सामान्य कुटुंबातील मुलगी आहे. तिने केलेल्या MPSC परीक्षेच्या तयारीविषयी ती सांगते; “घरची परिस्थिती हलाखीची असल्याने कोचिंग क्लासची फी परवडणारी नव्हती. त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या (MPSC Success Story) अभ्यासासाठी कोणताही क्लास न लावता स्वतःच्या हिमतीवर अभ्यास केला. परीक्षेची तयारी कोल्हापुरातील बापट कॅम्प येथे राहून केली. अभ्यासाच्या काळात सण आणि इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचं टाळलं आणि संपूर्ण लक्ष आभासावर केंद्रित केलं.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com