MPSC Success Story : शेतमजुराच्या मुलाच्या खांद्यावर झळकले PSI चे स्टार; काबाडकष्ट करून क्रॅक केली स्पर्धा परीक्षा

करिअरनामा ऑनलाईन। आई वडील दोघेही मोलमजुरी करणारे.. घरी अठरा विश्व दारिद्र्य.. तरीही शिकून मोठं व्हायचं (MPSC Success Story) असा चंग या घरातील तरुणाने बांधलेला. आई-वडिलांसोबत त्यांना कामात तर मदत केलीच. पण स्वतः कृषी साहित्य विक्रीच्या दुकानात काम करत स्पर्धा परीक्षेचीही तयारी केली. अखेर या कष्टाचे चीज झाले आणि बीड मधील एका छोट्या गावचा तरूण पोलीस उपनिरीक्षक बनला…

खाकी वर्दीचं स्वप्न सत्यात अवतरलं

दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर डोंगरा एवढ्या संकटाला भेदून यशाला गवसणी घालणे शक्य होते. हेच राज्यातल्या अनेक शेतकरी आणि शेतमजूरांच्या मुलांनी वेळोवेळी सिद्ध केलं आहे. खाकी वर्दी अंगावर असावी असं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणाने मिळेल ते काम करून अभ्यास केला. आणि बीड जवळच्या शिदोड येथील (MPSC Success Story) ज्ञानेश्वर देवकते हा तरुण पीएसआय झाला. हलाखीच्या परिस्थितीतही त्यानं आपलं शिक्षण बंद पडू दिलं नाही आणि याच जिद्दीच्या आणि परिश्रमाच्या जोरावर तो आज पोलीस उपनिरीक्षक झाला आहे.

MPSC Success Story of dnyaneshwar devkate

कधी हमाली केली तर कधी शेतकाम केलं (MPSC Success Story)

ऊसतोड मजुराच्या कुटुंबात जन्माला आलेल्या ज्ञानेश्वरने परिस्थितीवर मात करून पोलीस निरीक्षक होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण केलं. दहावीनंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी पैसे नसल्याने त्याने कधी हमाली केली तर कधी शेतात काम केलं. ज्ञानेश्वर पोलीस व्हावा यासाठी त्याच्या आई-वडिलांनी देखील शेतामध्ये मोलमजुरी करून त्याला पैसे पुरवले. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना तो दिवसभर शेतात काम करायचा आणि रात्री अभ्यास करायचा पोलीस होण्याची त्याची पहिली संधी सहा गुणाने हुकली. तरीदेखील त्याने खचून न जाता पुन्हा प्रयत्न सुरुच ठेवले आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याने 248 गुण मिळवून तो अधिकारी झाला आहे.

आई – वडिलांच्या कष्टाचं चीज झालं

ज्ञानेश्वरचे आई वडील ऊसतोड मजूर आहेत मोलमजुरी करून आणि स्वतःच्या तीन एकर शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. अशा परिस्थितीतही त्याच्या आई वडिलांनी त्याच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू दिले नाहीत. ज्ञानेश्वरने शिकून अधिकारी व्हावं यासाठी त्याच्या आई – वडिलांनी काबाडकष्ट केले.

हे पण वाचा -
1 of 88

MPSC Success Story of dnyaneshwar devkate

पाच वर्ष घेतले अथक परिश्रम

पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्ञानेश्वरने पाच वर्ष अथक परिश्रम घेतले. मोठ्या शहरात जाऊन अभ्यास करणं परिस्थितीमुळे शक्य नव्हतं. त्यामुळे त्याने बीडमध्ये राहून (MPSC Success Story) आपला अभ्यास पूर्ण केला. त्याच्या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यात त्याचे कौतुक होताना दिसत आहे.

MPSC Success Story of dnyaneshwar devkate

ग्रामीण भागातील अनेक मुलं-मुली स्पर्धा परीक्षेसाठी आपलं गाव, घर सोडून शहरामध्ये अभ्यासासाठी जात आहेत. पण काबाडकष्ट करून स्पर्धा परीक्षांसारख्या अवघड परीक्षेला सामोरे जाऊन त्यात यश मिळवता येतं हे ज्ञानेश्वरने दाखवून दिलं आहे. त्याचं उदाहरण स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ऊर्जा देणारे उदाहरण आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com