MPSC ने प्रसिद्ध केले २०२० मधील अंदाजित वेळापत्रक

Get real time updates directly on you device, subscribe now.

करीअरनामा । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०२० मधील आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले हे वेळापत्रक आयोगाकडून प्रसिद्ध झाल्यामुळे स्पर्धा परीक्षार्थींना सुखद धक्का बसला आहे. या अंदाजित वेळापत्रकानुसार स्पर्धा परीक्षार्थींना आता पुढील अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे.

या वेळापत्रकामध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा , संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब व गट-क, वनसेवा , अभियांत्रिकी सेवा , सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा , कृषी पूर्व परीक्षा इत्यादी परीक्षा यांच्या पूर्व परीक्षांच्या व मुख्य परीक्षांच्या तारखा जाहीर देण्यात आल्या आहेत. राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात पुढील महिन्यात डिसेंबर तर सयुंक्त पूर्व गट ब व गट क परीक्षेच्या जाहिराती अनुक्रमे फेब्रुवारी २०२० व एप्रिल २०२० मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल असे आयोगाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

हे पण वाचा -
1 of 85

पूर्व परीक्षांच्या तारखा पुढील प्रमाणे असतील –
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक – १५ मार्च २०२०
राज्यसेवा पूर्व परीक्षा – ०५ एप्रिल २०२०
संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब – ०३ मे २०२०
वनसेवा पूर्व परीक्षा – १० मे २०२०
अभियांत्रिकी पूर्व परीक्षा – १७ मे २०२०
संयुक्त पूर्व परीक्षा गट-क – ०७ जून २०२०
महाराष्ट्र कृषी पूर्व परीक्षा – ०५ जुलै २०२०

अंदाजित वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लीक करा –  www.careernama.comGet real time updates directly on you device, subscribe now.