MPSC Recruitment 2022 : MPSC ची मोठी घोषणा!! तब्बल 800 जागांवर होणार पद भरती; ही संधी सोडू नका

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र (MPSC Recruitment 2022) लोकसेवा आयोगाने तब्ब्ल 800 जागा भरण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहायक कक्ष अधिकारी गट-ब, राज्य कर निरीक्षक गट-ब, पोलीस उप निरीक्षक गट-ब, दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक गट-ब या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2022 आहे.

या पदांवर होणार भरती –

  • सहायक कक्ष अधिकारी गट – ब (Assistant Section Officer)
  • राज्य कर निरीक्षक गट – ब (State Tax Inspector)
  • पोलीस उप निरीक्षक गट – ब (Police Sub-Inspector)
  • दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक – पोलीस उप निरीक्षक गट – ब (Sub Register)

एकूण जागा – 800 पदे (MPSC Recruitment 2022)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –

इच्छुक उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारास मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे – (MPSC Recruitment 2022)

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज फी –

आमागास प्रवर्गातील – रु. 394/-

मागासवर्गीय व अनाथ प्रवर्गातील – रु. 294/-

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 15 जुलै 2022 (MPSC Recruitment 2022)

सविस्तर माहितीसाठी येथे CLICK करा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – https://mpsconline.gov.in/candidate

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com