पोर्टलवरील प्रोफाईल अपडेट करण्याच्या MPSC आयोगाच्या उमेदवारांना सूचना

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा आणि इतर परीक्षांसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर एक प्रोफाइल बनवावे लागते. त्या प्रोफाइलच्या माध्यमातून उमेदवार विविध परीक्षांना अर्ज करू शकतो. ज्या उमेदवारांनी प्रोफाइल बनवलेले आहे त्यांना संकेतस्थळावरील प्रोफाईल अद्यायावत करावे लागणार आहे. अद्यायावत करण्याची सुविधा शुक्रवारी (ता.२८) सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध होणार आहे. उमेदवारांकडून येणाऱ्या अर्ज ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वीकारण्याची व्यवस्था आयोगाने २०१०मध्ये कार्यन्वित केली. प्रणालीच्या विकसन, सुधारणा आणि देखाभालीच्या कामासाठी मेसर्स महाऑनलाइन लिमिटेड या सेवा पुरवठादार संस्थेची २०१३मध्ये नियुक्ती केली होती. आता या कामासाठी अन्य संस्थेची नियुक्ती केली आहे.

सुरु झालेली नवीन प्रणाली अजून चांगल्या प्रकारे विकसित करण्यासाठी उमेदवारांनी यापुर्वीच्या प्रणालीतील त्यांच्या प्रोफाइलमधील माहिती आणि त्यांच्या खात्याचे पासवर्ड अद्यायावत करणे आवश्यक आहे. त्याशिवाय सुधारित ऑनलाइन प्रणालीवरील प्रोफाईल उमेदवारांना वापरता येणार नाही, असे आयोगाच्या माहिती तंत्रज्ञान सहसचिवांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार प्रोफाइल अद्यायावत करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नाही. परंतु एखाद्या भरतीच्या जाहिरातीस अनुसरून अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने पासवर्ड रिसेट करणे आवश्यक आहे, असेही आयोगाने स्पष्ट केले. त्यामुळे आयोगाच्या आता येणाऱ्या जाहिरातीच्या अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले प्रोफाईल अद्ययावत करणे गरजेचे आहे.

 

हे पण वाचा -
1 of 10

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com