MPSC News : पुन्हा परीक्षा घेण्याचा MPSCचा अट्टाहास; कौशल्य चाचणी सर्वांना बंधनकारक; विद्यार्थ्यांमधून संताप

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत कर (MPSC News) सहाय्यक व लिपिक आणि टंकलेखक या पदासाठी दि. 7 एप्रिल रोजी कौशल्य चाचणी परीक्षा घेतली होती. यावेळी काही उमेदवारांना परीक्षा देण्यास तांत्रिक अडचण आली होती. आता MPSC ने सर्वच उमेदवारांसाठी बुधवार दि. 31 मे रोजी पुन्हा कौशल्य चाचणी आयोजित केली आहे.
गेल्या वर्षी गट-क अंतर्गत सहाय्यक व लिपिक आणि टंकलेखक या (MPSC News) पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती व काही दिवसांपूर्वीच परीक्षेचा कौशल्य विकास चाचणीचा शेवटचा टप्पा पार पडला होता. गट-क अंतर्गत सहाय्यक पदाच्या 285 तर लिपिक व टंकलेखक पदांसाठी 1 हजार 77 जागांसाठी आयोगाकडून परीक्षा घेण्यात आली होती.

जवळपास एक वर्ष या परीक्षेची प्रक्रिया सुरु आहे. आधीच परीक्षेची प्रक्रिया लांबली जात असताना पुन्हा काही उमेदवारांसाठी सर्वांना परीक्षा द्यावी लागणे हे अन्यायकारक आहे. आम्ही (MPSC News) कोणत्याही परिस्थितीमध्ये परीक्षा देणार नाही, अशी भूमिका या परीक्षेच्या उमेदवारांनी घेतली होती. मात्र MPSCने उमेदवारांच्या मागणीला न जुमानता पुन्हा एकदा परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले.

सर्वांना परीक्षेची सक्ती नको (MPSC News)
परीक्षा पुन्हा न देण्याच्या उमेदवारांच्या भूमिकेला काही राजकीय नेत्यांनीही आयोगाला पत्र लिहून पाठिंबा दिला होता. मात्र आयोगाने ताठर भूमिका घेताना कोणाला जुमानले नाही. गेली अनेक (MPSC News) वर्षे आम्ही अभ्यास करतोय. आयुष्य पणाला लावून आम्ही इथपर्यंत पोहचलो आहे. ज्यांना कोणाला तांत्रिक अडचण आली असेल त्यांची व्यवस्थित पुन्हा परीक्षा घ्यावी. मात्र सर्वांनी पुन्हा परीक्षा देण्याचा अट्टहास आयोगाने धरू नये, अशी विनंती उमेदवारांनी आयोगाकडे केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com