MPSC Exam 2022 : MPSC च्या राज्यसेवा परीक्षेचं हॉल तिकीट जारी; असं करा Download

करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 साठी हॉल तिकीट (MPSC Exam 2022) जारी केले आहे. mpsconline.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन उमेदवार त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. राज्य सरकारमधील विविध पदांच्या भरतीसाठी MPSC राज्य सेवा प्राथमिक परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी घेण्यात येणार आहे. MPSC राज्य सरकारमधील विविध पदांवर 161 रिक्त पदांच्या भरतीसाठी ही परीक्षा होणार आहे.

असं डाउनलोड करा MPSC हॉल तिकीट 2022 –

  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mpsconline.gov.in ला भेट द्या आणि ‘लॉग इन’ टॅबवर क्लिक करा.
  2. नोंदणीकृत ई मेल आयडी किंवा मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  3. हॉल तिकीट लिंकवर क्लिक करा.
  4. MPSC राज्यसेवा प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  5. डाउनलोड करा आणि प्रिंट आउट घ्या.

असं असेल एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेचं स्वरुप – (MPSC Exam 2022)

  1. एमपीएससी परीक्षेचे दोन्ही पेपर प्रत्येकी 200 गुणांचे असतील.
  2. प्रत्येक पेपरचा कालावधी दोन तासांचा आहे.
  3. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 गुण वजा केले जातील.
  4. सर्व प्रश्न इंग्रजी आणि मराठीत असतील.
  5. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची शॉर्ट लिस्टिंग त्यांना दोन्ही पेपरमध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित असणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com