दिवाणी न्यायाधीश पदाच्या पूर्व परीक्षेतून 760 उमेदवार पात्र

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसभा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेतून 760 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.

आयोयातर्फे दिवाणी न्यायाधीश आणि  न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) यातील 74 पदांसाठी 1 मार्चला पूर्व परीक्षा घेण्यात आली होती.या परीक्षेतून पात्र ठरलेले उमेदवार मुख्य परीक्षा देणार आहेत.

मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना परीक्षेचा अर्ज आणि परीक्षा शुल्क मुदतीत भरणे गरजेचे आहे. उमेदवारांनी मुख्य परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.त्यासाठी परीक्षा केंद्र निश्चित करूनच शुल्क भरायचे आहे. असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com