MPSC Bharti 2022: दहावी उत्तीर्णांसाठी मंत्रालय आणि सरकारी विभागात टायपिस्ट भरती सुरु; पहा सविस्तर

करिअरनामा ऑनलाईन। सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २५३ वेगवेगळ्या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. (MPSC Bharti 2022 for Typist) महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयातील विविध प्रशासकीय विभाग तसेच मुंबईतील विविध शासकीय कार्यालयातील लघुटंकलेखक, लघुलेखक पदांसाठी ही भरती होणार आहे.

मराठी, इंग्रजी टायपिंग येणाऱ्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची हि उत्तम संधी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक पदांच्या एकूण 253 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. (MPSC Bharti 2022 for Typist) अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2022 आहे. अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

पदाचे नाव – उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक

पद संख्या – 253 जागा

  • उच्च श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्ग – एकूण ३० पदे
  • उच्च श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्ग – एकूण ३२ पदे
  • लघुटंकलेखक(इंग्रजी), गट क संवर्ग – एकूण ३९ पदे
  • लघुटंकलेखक(मराठी), गट क संवर्ग – एकूण ५२ पदे
  • निम्न श्रेणी लघुलेखक(मराठी), गट ब, अराजपत्रित संवर्ग – एकूण ५५ पदे
  • निम्न श्रेणी लघुलेखक(इंग्रजी), गट ब, अराजपत्रित संवर्ग – एकूण ४५ पदे

शैक्षणिक पात्रता –
दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक. लघुलेखनाची गती १०० शब्द प्रति मिनिट. टायपिंग गती ३० ते ४० शब्द प्रति मिनिट

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र

अर्ज शुल्क –

अमागास – रु. 394/-
मागासवर्गीय- रु. 294/-
माजी सैनिक – रु. 44/-

वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – 43 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 मे 2022 (MPSC Bharti 2022 for Typist)

अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com