Microsoft Jobs : Microsoft ची भारतात मोठी जॉब ओपनिंग; या लिंकवर करा APPLY

करिअरनामा ऑनलाईन । मायक्रोसॉफ्टच्या अझ्युर (Azure) या हार्डवेअर आणि (Microsoft Jobs) इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मोठी पदभरती जाहीर केली आहे. कंपनीला सध्या सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची गरज आहे. मायक्रोसॉफ्ट अझ्युरचा सध्या मोठा विस्तार होतो आहे. अनेक नवीन फीचर्स त्यात समाविष्ट होणार आहेत. म्हणूनच कंपनीच्या एक्झिक्युटिव्ह ऑफिसमध्ये कंपनीला सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची आवश्यकता आहे. त्यासाठी उमेदवार अर्ज करू शकतात.

हे पण वाचा -
1 of 15

IT क्षेत्रात सध्या सॉफ्टवेअर इंजिनीअर्ससाठी चांगल्या संधी आहेत. मायक्रोसॉफ्ट अझ्युरने सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या पदासाठी भरती सुरू केली आहे. हैदराबाद इथल्या ऑफिससाठी ही पदभरती असेल. या पदासाठी फ्रेशर्स अर्ज करू शकतात. उमेदवाराला 0 ते 2 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. उमेदवाराला तांत्रिक ज्ञान असलं पाहिजे. अल्गोरिदम डिझाइन, डेटा स्ट्रक्चर आणि कोडिंग हे कम्प्युटर सायन्सचं प्राथमिक ज्ञान उमेदवाराकडे असणं गरजेचं आहे.

अशा असतील जबाबदाऱ्या – (Microsoft Jobs)

– सर्व्हिस डिझाइन, कोडिंग आणि अंमलबजावणीमध्ये उत्कृष्ट कामगिरी, पुनर्वापर यावर भर देणं.

सर्वोत्कृष्ट इंजिनीअरिंग प्रोसेस तयार करण्यासाठी सहभागी होणं

– इतर विभागांशी चांगला समन्वय साधणं (Microsoft Jobs)

– प्रोजेक्ट, सहकारी व क्लायंट यांच्याकडून वेगानं माहिती मिळवणं

आवश्यक पात्रता –

1. उमेदवाराकडे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रात किमान एक किंवा शक्यतो दोन वर्षांचा अनुभव असला पाहिजे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलं पाहिजे. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आणि डिझायनिंग, अल्गोरिदम्स, डेटाबेस आयडियाज, no-SQL टेक्नॉलॉजीज, मायक्रोसर्व्हिस आर्किटेक्चर या (Microsoft Jobs) तांत्रिक गोष्टींचं ज्ञान सध्याच्या बिझनेससाठी उमेदवाराकडे आवश्यक असतं. त्याशिवाय कोड लिहिणं, बग फिक्सिंग, डिझायनिग, टेस्टिंग आणि प्रॉब्लेम्स सोडवणं या गोष्टीही उमेदवाराला जमल्या पाहिजेत.

2. पात्र उमेदवाराकडे सॉफ्टवेअर इंजिनीअरिंग किंवा कम्प्युटर सायन्समधली पदवी असावी. उमेदवारानं याआधी क्लाउड बेस्ड अ‍ॅप्सच्या डेव्हलपमेंटवर काम केलेलं असावं. व्हिज्युअल डिझाइन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि प्रोग्रामिंग यासाठी उत्तम कौशल्यं असावीत. कामावर थोडी देखरेख करता यायला हवी. उमेदवाराकडे मॉडर्न React आणि Angular या UX Frameworksची माहिती, HTML5, CSS3, Javascript, JQuery आणि Typescript याचं ज्ञान अत्यावश्यक आहे.

असा करा अर्ज – 

इच्छुक उमेदवार https://careers.microsoft.com/us/en/job/1501992/Software-Engineer?jobsource=offcampusjobs4u.com या लिंकवर अर्ज करू शकतात. एक्झिक्युटिव्ह ऑफिसमध्ये हाय क्वालिटी सॉफ्टवेअर सोल्युशन्स देण्यासाठी, रिपोर्टिंग अँड डेटा अ‍ॅनालिटिक्स प्लॅटफॉर्म्स/ व्हिज्युअलायझेशन डॅशबोर्ड्स यात मदत करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट अझ्युरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर (Microsoft Jobs) पदासाठी भरती सुरू आहे. इच्छुक व पात्र उमेदवार लगेचच त्यासाठी अर्ज करू शकतात.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com