MHT-CET 2020 Result ; असा पहा निकाल

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) इंजिनीअरिंग, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल शनिवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आला. या परीक्षेत पीसीबी गटात 19 विद्यार्थ्यांना 100  पर्सेंटाइल गुण तर पीसीएम गटात 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत.

100  पर्सेंटाइल गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये पीसीएम गटात पुण्याची सानिका गुमास्ते, शुभम जोग तर मुंबईतून केतकी देशमुख, चैतन्य व्होरा, सोहम चिटणीस, निष्ठा पांडे, आर्यमन शार्दुल, रिशभ बाली, पार्थ गुजराती आण ठाण्यातून पवन कुंटे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.पीसीबी गटात पुण्याचा अनिष जगदाळे, पालघरची वर्षा खुशवाह, मुंबईतील तनय मांजरेकर, देवेश शाह, जयेश चौधरी, परिता गाडा या विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल मिळाले आहेत. पीसीबी आणि पीसीएम ग्रुपची परीक्षा 1 ते 20 ऑक्टोबर दरम्यान झाली. या परीक्षेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित केली होती. ही परीक्षा राज्यात 187 केंद्रांवर आणि राज्याबाहेरील 10 अशा एकूण 197 केंद्रांवर जाहीर करण्यात आली होती.

तीन लाख 86  हजार 604 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात एक लाख 74 हजार 679 विद्यार्थ्यांनी पीसीएम तर दोन लाख 1 हजार 925 विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुपमधून परीक्षा दिली आहे. परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे. या निकालामुळे आता इंजिनीअरिंग प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

येथे निकाल पहा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.