MHT CET 2020 काऊन्सेलिंग प्रक्रिया ५ डिसेंबर पासून सुरू

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र सीईटी सेल MHT CET 2020 काऊन्सेलिंग प्रक्रिया ५ डिसेंबर पासून सुरू करणार आहे. पीसीएम (PCM) आणि पीसीबी (PCB) दोन्ही ग्रुपसाठी शनिवार ५ डिसेंबरपासून समुपदेशन फेऱ्यांना सुरुवात होईल. कोविड – १९ महामारी स्थितीमुळे या फेऱ्या ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सीईटी कक्षाची अधिकृत वेबसाइट पहावी.

MHT CET Councelling 2020 –

या प्रक्रियेत नोंदणी, शुल्क भरणे आणि प्रमाणपत्र पडताळणी या टप्प्यांचा समावेश असेल.

जे विद्यार्थी MHT CET Councelling 2020 साठी पात्र असतील त्यांना स्वतंत्रपणे काऊन्सेलिंग शुल्क भरावे लागणार नाही.

ज्या विद्यार्थ्यांनी MHT CET 2020 साठी JEE Main स्कोअरच्या आधारे अर्ज केला आहे, त्यांना देखील MHT CET Councelling 2020 साठी नोंदणी करावी लागेल आणि शुल्क भरावे लागेल.

MHT CET Councelling 2020 ही बीटेक प्रवेशांसाठीची केंद्रीय समुपदेशन प्रक्रिया (CAP) आहे.

MHT CET Councelling 2020 प्रक्रियेतील सीट अलॉटमेंट प्रक्रिया ही पूर्णपणे गुणवत्तेवर आणि विद्यार्थ्यांनी भरलेल्या प्राधान्यक्रमांवर आधारलेली असेल.

MHT CET 2020 Result २८ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला आहे. ४१ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळवण्यात यश मिळाले आहे. १९ विद्यार्थी PCB गटात तर २२ विद्यार्थी PCM गटात टॉप होते.पीसीबी आणि पीसीएम ग्रुपची परीक्षा १ ते २० ऑक्टोबर दरम्यान झाली. या परीक्षेला विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळाल्याने परीक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित केली होती. ही परीक्षा राज्यात १८७ केंद्रांवर आणि राज्या बाहेरील १० अशा एकूण १९७ केंद्रांवर जाहीर करण्यात आली होती. तीन लाख ८६ हजार ६०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. यात एक लाख ७४ हजार ६७९ विद्यार्थ्यांनी पीसीएम तर दोन लाख ११ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी पीसीबी ग्रुपमधून परीक्षा दिली होती.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com