MHT CET Admit Card 2020 । असे करा तुमचे Hall Ticket Download

करिअरनामा ऑनलाईन | महाराष्ट्र सामान्य प्रवेश चाचणी अर्थात MHT CET 2020 चे भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र-गणित अर्थात ए ग्रुपचे प्रवेशपत्र अधिकृत एमएचटीसीईटी च्या अधिकृत वेबसाईट वरून प्रसिद्ध झाले आहे. औषधशास्त्र आणि जीवशास्त्र विषयाची प्रवेशपत्रे याआधीच प्रसिद्ध झाली आहेत. अभियांत्रिकी साठीची प्रवेशपत्रे अद्याप प्रसिद्ध झाली नव्हती. mhtcet2020.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर पात्र विद्यार्थ्यांना आपले प्रवेशपत्र पाहता येणार आहे. ते त्यांना डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. ते कसे डाऊनलोड करायचे याबाबत पाहूयात MHT CET Admit Card 2020

१. उमेदवाराने mhtcet2020.mahaonline.gov.in. या संकेतस्थळावर जावून एमएचटी- सीईटी २०२० च्या वेब पोर्टल ला भेट द्यायची आहे.
२. एकदा पोर्टल वर गेल्यावर “Click here to download MHT-CET 2020 Hall Ticket” यावर क्लिक करावे.
३. आपल्या अर्ज क्रमांक लिहून सोबत विषय टाकावा
४. ‘Search’ वर क्लिक केल्यावर समोर प्रवेशपत्र दिसेल.
५. उमेदवाराने त्याची पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी “Print Admit Card” वर क्लिक करावे
६. हेच प्रवेशपत्र परीक्षा केंद्रावर घेवून जायचे आहे.

याआधी पीसीबी ग्रुपच्या बी फार्मच्या प्रवेशपत्रासंबंधित प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याच्या आणि विनाअट हमीच्या अधिकृत सूचना देण्यात आल्या होत्या. प्रवेशपत्रात परीक्षेची तारीख, वेळ, केंद्र आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीचा समावेश आहे, तसेच कोरोना च्या संदर्भातील काळजीची मार्गदर्शक सूचीही जोडली आहे. यावर्षी दोन्ही ग्रुप साठी जवळपास चार लाख ४५ हजार ७८० उमेदवारांनी अर्ज केला आहे. MHT CET Admit Card 2020

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा –  (https://careernama.com)

MHT CET 2020 Exam Date | राज्यातील सर्व CET परीक्षा पुढे ढकलल्या

MHT CET 2020 | विद्यार्थ्यांसाठी राज्य परिवहन मंडळाकडून 1500 अतिरिक्त बसची व्यवस्था

IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही