MHT – CET 2020 चे सुधारित वेळापत्रक जाहीर

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन । (MHT-CET 2020 Exam Date) महाराष्ट्राच्या सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने MAH AAC CET 2020 परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर केल्या आहेत.  वेळापत्रकानुसार, ही प्रवेश परीक्षा 17 आणि 18 ऑक्टोबर 2020 रोजी आयोजित करण्यात आली आहे. 17 आणि 18 ऑक्टोबरला सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत ही परीक्षा होईल. फाइन आर्ट आणि अप्लाइट आर्टच्या यूजी अभ्यासक्रमांसाठी ही सीईटी परीक्षा घेतली जाते. राज्य सीईटी कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर cetcell.mahcet.org सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

कोविड-१९ विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विषयक खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक परीक्षा केंद्रावर 50 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रॅक्टिकल परीक्षा (ऑब्जेक्ट ड्रॉइंग, डिझाइन प्रॅक्टिकल, मेमरी ड्राइंग आणि जनरल नॉलेज) 50 टक्के विद्यार्थ्यांसाठी 17 ऑक्टोबर रोजी तर 50 टक्के विद्यार्थ्यांसाठी 18 ऑक्टोबर रोजी होईल.

MAH AAC CET 2020 चे अॅडमिट कार्ड 1 ऑक्टोबर रोजी उपलब्ध केले जाणार आहेत. अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना १८ ऑक्टोबर २०२० पर्यंत हे प्रवेश पत्र डाऊनलोड करता येतील. हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याविषयीची तपशीलवार माहिती आणि लिंक लवकरच सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावर देण्यात येईल.

MHT-CET 2020 Exam Date

हे पण वाचा -
1 of 3

अधिकृत वेबसाईट – http://cetcell.mahacet.org/

सुधारित वेळापत्रक – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – http://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: