MH CET Exam 2022 : 12 वीच्या मार्कांचं महत्व वाढणार!! आता CET बरोबरच 12 वीचे मार्क्सही महत्वाचे

करिअरनामा ऑनलाईन । MH CET परीक्षेत काही महत्त्वाचे बदल (MH CET Exam 2022) राज्य शिक्षण मंडळाने केले आहेत. राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच MHT CET 2022 ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करून दिली होती. उच्च आणि तंत्रशिक्षण मंडळाकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र CET परीक्षेत काही महत्त्वाचे बदल राज्य शिक्षण मंडळातर्फे करण्यात आले आहेत.

पुढच्या वर्षीपासून CETचा निकाल 1 जुलै ला लागेल आणि 1 सप्टेंबर पासून सत्र सुरू होईल अशा प्रकारचे नियोजन आहे अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसंच या संदर्भातील मोठा बदल म्हणजे आतापर्यंत विद्यार्थ्यांना पदवीच्या शिक्षणासाठी CET च्या मार्कांवर प्रवेश देण्यात येत होता. मात्र आता बारावीचे ५०% आणि CET चे ५० % अशा एकूण मार्कांवर पदवी कार्यक्रमाला प्रवेश देण्यात येणार आहे. यामुळे बारावीच्या मार्कांचं महत्व नक्कीच वाढणार आहे असं सामंत यांनी सांगितलं आहे.

ज्या विद्यार्थ्यांना CET परीक्षा दिल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या पदवी कार्यक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना आणि सीईटी द्वारे होणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रवेशांना हा नियम लागू असणार आहे.

अशा असतील परीक्षेच्या तारखा – (MH CET Exam 2022)

  • MHT CET Exam 2022 साठी PCM ग्रुपची परीक्षा येणाऱ्या 05 ते 11 ऑगस्ट, 2022 या दरम्यान घेण्यात येणार आहे.
  • PCB ग्रुपची परीक्षा ही 12 ते 20 ऑगस्ट, 2022 दरम्यान होणार आहे.
  • 15, 16 व 17 ऑगस्ट या तारखांना कोणताही पेपर नसेल.

JEE , NEET आणि MHT CET या परीक्षांच्या तारखांमध्ये ओव्हरलॅपिंग होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे ही परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com