Mega Bharti 2020 आॅफलाईन पद्धतीनेच होणार, मुख्यमंत्र्यांचा शब्द

मुंबई प्रतिनिधी | शासकिय मेगाभरती २० एप्रिल पासून सुरु होणार असल्याचे नुकतेच सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र खाजगी एजन्सीद्वारा नोकर भरतीला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपला विरोध दर्शवला होता. यापार्श्वभुमीवर पवार यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. Mega Bharti 2020

रोहित पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या भेटी दरम्यान नोकर भरती प्रक्रिया आॅफलाईन पद्धतीनेच होणार असा शब्द ठाकरे यांनी पवार यांना दिला आहे. राज्यात लवकरच होणाऱ्या नोकरभरतीसंदर्भात काल मुख्यमंत्री साहेबांना भेटलो असता, “रोहित तू काहीही काळजी करु नको आणि मुलांनाही सांग. यापुढील नोकर भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीनेच होईल”, अशा शब्दांत मुख्यमंत्री महोदयांनी आश्वस्त केलं असल्याचे पवार यांनी सांगितले.

दरम्यान शासकीय मेगाभरतीची तारीख निश्चित झाली असून १५ एप्रिलपर्यंत खासगी एजन्सी नियुक्त करून २० एप्रिलपासून मेगाभरतीला सुरवात होणार आहे. मात्र खाजगी एजन्सीद्वारा भरती प्रक्रियेवर आमदार पवार यांनी आक्षेप घेतला होता. केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती करता येते तर महाराष्टात का होऊ शकत नाही ? असाही प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. Mega Bharti 2020

राज्यातील शासकीय विभागांतील रिक्त पदांची संख्या आता दोन लाखांवर पोहचली आहे. थेट जनतेशी संबंधित गृह, सार्वजनिक आरोग्य, सामाजिक न्याय, जलसंपदा, कृषी व पशुसंवर्धन,महसूल व वने, महिला व बालविकास या विभागांत सर्वाधिक रिक्त पदे आहेत. Mega Bharti 2020

नोकरी आणि करिअर विषयक माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्याकरता आम्हाला 7821800959 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा ‘Hello Job’