कोल्हापुर, मुंबई विभागातील पात्र शिक्षकांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाची आढावा बैठक आज घेण्यात आली. यावेळी अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळांचे 20% व 40% अनुदान मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली.

तसेच पुरवणी मागणीसाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार यांनी दिल्या. यामुळे कोल्हापुर व मुंबई विभागातील पात्र शिक्षकांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

समग्र शिक्षण अंतर्गत राज्याचा हिस्सा, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांचे वेतन, औरंगाबाद विभागातील शाळा दुरुस्तीसाठी प्राप्त निधीबाबत, भारतरत्न राजीव गांधी सायन्स सिटी पुणे,चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्या शाळांच्या दुरुस्ती व बांधकामासाठी अनुदान याबाबत आजच्या शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत निर्णय घेण्यात आले. शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी शिक्षण विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक तरतुदी व उपाययोजनाची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सादर केली.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com