वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी खुशखबर ! मेडिकलच्या जागा वाढणार

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा । बारावी नंतर ज्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी देशातील मेडिकलच्या जागा वाढणार आहेत. उच्च शिक्षणासाठी या क्षेत्राची निवड करणार असाल तर याचा नक्कीच फायदा होणार आहे.

देशात मेडिकल क्षेत्रातील जागा वाढवण्याच्या प्रस्तावाला मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नसने मंजुरी दिली आहे. गेली पाच वर्षांत वाढलेल्या जागांहून अधिक यावर्षी मेडिकलच्या जागा वाढणार आहेत, असे बोर्ड ऑफ गव्हर्नसचे अध्यक्ष आणि निती आयोगाचे सदस्य वी. के. पॉल यांनी सांगितले.

मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या बोर्ड ऑफ गव्हर्नसने 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून पीजी मेडिकल अभ्यासक्रमाच्या 4801 जागा वाढवण्याची परवानगी दिली आहे. यामुळे पीजीच्या (एमडी आणि एमएस) एकूण जागा 36,192 होणार आहेत. 2014-15 पर्यंत देशात सरकारी आणि खासगी महाविद्यालयांमध्ये पीजी मेडिकलच्या एकूण २३ हजार जागा होत्या. आता त्या जागा वाढणार आहेत.

अधिक माहितीसाठी – http://www.careernama.com यावर क्लिक करा आणि नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

%d bloggers like this: