पुण्याच्या ज्ञानप्रबोधीनीतून शिक्षण घेतलेले मनोज नरवणे देशाच्या लष्कर प्रमुखपदी

Get real time updates directly on you device, subscribe now.

 करिअरनामा । लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी देशाचे नवे लष्करप्रमुख म्हणून आज मंगळवारी पदभार स्वीकारला. नरवणे यांच्या रूपाने मराठी व्यक्ती लष्कराच्या सर्वोच्चपदी विराजमान झाली असून, नरवणे देशाचे २८वे लष्करप्रमुख ठरले आहेत. दरम्यान, जनरल बिपीन रावत यांची केंद्र सरकारने संरक्षण प्रमुखपदी निवड केली असून, ते आज लष्करप्रमुख पदावरून निवृत्त झालेत.

नरवणे यांची नियुक्ती हा देशाप्रमाणेच महाराष्ट्रासाठीही अभिमानास्पद क्षण आहे. नरवणे यांना ३७ वर्षांचा अनुभव असून, नरवणे यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून सप्टेंबर २०१९ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. आज ते देशाचे लष्करप्रमुख झालेत.
हे पण वाचा -
1 of 353
मनोज नरवणे यांनी सुरूवातीचे शिक्षण पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी शाळेतून घेतले. चित्रकलेची त्यांना आवड आहे, हे विशेष. पुण्यातील एनडीएमधील प्रशिक्षणानंतर डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीत त्यांनी पुढील प्रशिक्षण घेतले. लष्करातील प्रदीर्घ सेवेत त्यांनी ‘आसाम रायफल्स’चे महानिरीक्षक, जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख म्हणून कार्य केले आहे.

_—-__

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

[email protected]

Get real time updates directly on you device, subscribe now.