मालेगाव महापालिकेत जवळपास ६० टक्के पदे रिक्त

करिअरनामा । शासनाने नोकर भरतीसाठी उत्पन्नाच्या ३५ टक्क्यांच्या आत आस्थापना खर्चाचे निर्बंध  घातल्यामुळे येथील महापालिकेत एल तपापासून नोकरभरती रखडली असून आजच्या घडीला तब्बल ६० टक्के पदे रिक्त झाली आहेत.

सद्यस्थितीत वर्ग एकची मंजूर ३२ पैकी २६ पदे रिक्त आहेत. वर्ग दोनची ६७ पैकी ५६ पदे रिक्त आहेत. वर्ग तीनची १०४८ पैकी ७९७ तर वर्ग चारची १५२८ पैकी ७१५ पदे रिक्त आहेत. अशा रीतीने महापालिका आस्थापनेवरील एकूण २६७५ पदांपैकी १५९४ म्हणजेच तब्बल ६० टक्के पदे रिक्त असून केवळ ४० टक्के अधिकारी – कर्मचाऱ्यांवर महापालिकेच्या कारभाराचा गाडा हाकलण्याची कसरत सुरु आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे एकीकडे प्रशासकीय कामावर ताण अडत असताना दुसरीकडे महापालिका अस्तित्वात आल्यापासून गेल्या १८ वर्षात किरकोळ अपवाद वगळता कर्मचाऱ्यांना पदोन्नती देतानाही प्रशासनाने सरकारी धोरणाला हरताळ फासल्याचे वास्तव आहे.

२००१ मध्ये येथील नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले. प्रारंभी पालिका आस्थापनेवरील रिक्त पदांच्या प्रमाणात नोकरभरती होत असे. २००६ मध्ये महापालिकांच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत ३५ टक्क्यांहून अधिक आस्थापना खर्च असल्यास नोकरभरतीवर टाच आणणारा फतवा शासनाने काढला. यामुळे ४५ टक्क्यांच्या आसपास आस्थापना करच असलेल्या मालेगाव महापालिकेच्या सरळसेवा भरतीसाठी हात बांधले गेले.

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.