पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेला १० ऑगस्ट पासून सुरुवात

करिअरनामा ऑनलाईन । शैक्षणिक वर्ष 2020 -21 या वर्षाच्या तंत्रशिक्षण (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया 10 ऑगस्ट 2020 ते 25 ऑगस्ट 2020  या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. अशी माहीती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

 विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी 336 सुविधाकेंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी 242 सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याच्या दृष्टीने गतवर्षीप्रमाणे वरील पैकी सुविधा केंद्रास भेट देऊन कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धती सोबतच ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे.

 विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही. अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्या पर्यंतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन माध्यमातून करू शकतील.प्रवेशासंबंधी सुविधा केंद्रांची यादी आणि e-Scrutiny पद्धतीची माहिती, अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती , हेल्पलाईन क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती http://www.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे सामंत यांनी संगितले.

 वेळापत्रक –

10  ते 25  ऑगस्ट –  ऑनलाइन अर्ज नोंदणी करणे, कागदपत्रे स्कॅन छायाप्रती अपलोड करणे आणि छाननीची योग्य पद्धत निवडणे.

11 ते 25 ऑगस्ट – कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे.

28 ऑगस्ट – तात्पुरती गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.

29 ते 31 ऑगस्ट – तात्पुरत्या गुणवत्ता याद्यांमध्ये विद्यार्थ्यांना तक्रार असल्यास, तक्रार करणे.

2 सप्टेंबर – अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.

अधिकृत वेबसाईट – http://www.dtemaharashtra.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com