Police Bharti 2021 | राज्यात जम्बो पोलिस भरती प्रक्रीया राबविण्यासाठी सरकार सज्ज

करिअरनामा ऑनलाईन ।वित्त विभागाने राज्य शासनाच्या पदभरतीवर आणलेल्या निर्बंधातून सूट दिली आहे.  पोलीस शिपायांची १२,५२८ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश गुरुवारी काढण्यात आला. यापैकी २०१९मधील रिक्त ५,२९७ पदे भरण्याला पहिल्या टप्प्यात अनुमती देण्यात आली असून, उर्वरित पदांसाठीचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे. Maharashtra Police Bharti 2021

लॉकडाऊनमुळे वित्त विभागाने सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता अन्य विभागांनी नवीन कोणतीही पदे भरण्यावर निर्बंध घातले होते. राज्याच्या आर्थिक स्रोतांवर प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर ४ मे २०२० रोजी निर्णय घेण्यात आला होता. या आदेशाने गृह विभागाला पोलीस भरतीसाठी त्यातून सूट देण्यात आली आहे. Maharashtra Police Bharti 2021

वित्त विभागाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपायांची पदे १०० टक्के भरण्यास  अनुमती दिली आहे. दिनांक १३ नोव्हेंबर २०२०च्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस शिपायांची २०१९ मधील रिक्त ५,२९७ पदे तसेच २०२० मधील ६,७२६ पदे, मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी ५०५ अशी एकूण १२,५२८ पदे भरण्यासाठी आधीचे निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यासंबंधीचा शासन आदेश  गुरुवारी काढण्यात आला.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा –  https://careernama.com